चिगुळे, शिंपेवाडी रस्त्यांसह वनविभागात अडकलेल्या रस्त्यांसाठी ‘आमदार ऍक्शन मूडवर ‘


मुख्य वनरक्षक, जिल्हाधिकाऱ्यांनी दिली सहकार्याची हमी; नागरिकांनीही आपापल्या रस्त्यांची कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन!

      

बेळगांव: लोकहित न्यूज (विलास कवठणकर, विशेष प्रतिनिधी)

        खानापूर तालुक्यात लोंढा, जांबोटी जिल्हा पंचायत विभागासह बहुतेक गावे आणि त्यांना जोडणारे रस्तेही जंगलप्रदेशात येतात. यातील बहुतेक रस्ते सरकारी दप्तरी नोंद आहेतच, कारण आतापर्यंतच्या काळात कोणत्या न कोणत्या तरी खात्यातून अशा रस्त्यांचा विकास साधलेला आहेच पण, अलीकडे वनखाते सर्वकाही माहिती असूनही डोळेझपणा करतांना दिसत आहे. कणकुंबी ते चिगुळे रस्त्याचे उदाहरण देता येईल, या रस्त्यावर आतापर्यंत अनेकवेळा खडीकरण, डांबरीकरण करण्यात आले असून, हा रस्ता पूर्वीपासून नोंद असतांनाही वनखाते जाणीवपूर्वक या रस्त्याला अडती देत असल्याने हे काम बंद पडले आहे. तशीच अवस्था शिंपेवाडी रस्त्याचीही आहे, शिवाय तसे अनेक रस्ते वनखात्याच्या लालफितीत अडकून पडले आहेत, त्या सर्व रस्त्यांचा पाठपुरावा लोकप्रिय आमदार विठ्ठल हलगेकर यांच्याकडून सुरू असून, त्यांनी जिल्हा मुख्य वनरक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांची या समस्येबाबत नुकतीच भेट घेतली. त्यावरून आमदार विठ्ठल हलगेकर पूर्णपणे ऍक्शन मूडवर आहेत…

तरीही कोणी आडकाठी आणत असेल तर त्यांची गय नाही ; आमदार…

       जंगलप्रदेशातील पूर्वींच्या नोंदी किंवा जुनी कागदपत्रे असणाऱ्या रस्त्यांचा विकास झालाच पाहिजे, तो आम्ही करून घेऊ अशी माहिती आमदार विठ्ठल हलगेकर यांनी लोकहित न्यूज शी बोलतांना दिली. तरीही कोणी विकासकामात आडकाठी आणत असेल तर त्यांची गय केली जाणार नाही असा इशाराही त्यांनी अधिकाऱ्यांना यावेळी दिला. यावर जिल्हाधिकारी महमद रोशन यांनी सर्वोतोपरी सहकार्य करण्याची हमी दिली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *