तीन चाललेल्या धार्मिक कार्यक्रमाचा आज झाला समारोप….
देवाचीहट्टी:लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
गोल्याळी (ता. खानापूर) येथील श्री जागंळी देव मंदिराचे आज लोकप्रिय आमदार विठ्ठल हलगेकर यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले. गेल्या तीन दिवसांपासून याठिकाणी सुरू असलेल्या धार्मिक कार्यक्रमांचा आज समारोप झाला. यावेळी फित कापून आमदार विठ्ठल हलगेकर यांनी मंदिराचे उद्धघाटन केले. यावेळी राज्य भाजप कार्यकारिणी सदस्य प्रमोद कोचेरी , तालुका भाजप प्रधान सचिव मालप्पा मारिहाळ, दौलत कोलीकर यांच्यासह गावकरी व आजूबाजूचे आजी माजी मान्यवर उपस्थित होते… यावेळी आमदार विठ्ठल हलगेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.






Leave a Reply