‘चिरतरुण आवाज’ थांबला; जेष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन!


उद्या 4 वाजता शिवाजी पार्क (दादर) मुंबईत होणार अंत्यसंस्कार!

        

   मुंबई: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

         ‘दम मारो दम’,’ पिया तू आजा’ सारख्या तारुण्य गाण्यांनी सर्वच वर्गाला नाचवणाऱ्या भारतीय संगीतातील गान कोकिळा  आणि मंगेशकर कुटुंबातील शेवटची बहीण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आशाताई भोसले यांचे आज हृदय विकाराच्या आजाराने निधन झाले. त्या 92 वर्षांच्या होत्या. उद्या (सोमवार दि.13 ) सायंकाळी 4 वाजता शिवाजी पार्क (दादर) मुंबईत त्यांच्या पार्थिवावर अत्यसंस्कार होणार आहे. आशाताई भोसले यांच्या जाण्याने भारतीय संगीतावर शोककळा पसरला आहे.

आशाताईंनी भारतीय संगीताची मोहोर जागतिक स्तरावर पोहचवली!

      वयाच्या 15 वर्षांपासून आशाताईंनी घरची जबाबदारी पेलली होती, आतापर्यंतच्या प्रवासात त्यांनी अनेक वादळे झेलली, तरीही त्या थांबल्या नाहीत. त्यांनी भारतीय संगीत जागतिक स्तरावर नेवून पोहचवले. 1000 चित्रपटात 1200 हून अधिक मराठी, हिंदी अनेक भाषांमध्ये त्यांनी गाणी गायली!

अनेक पुरस्काराने सन्मानित….

   प्रतिष्ठेच्या पद्मविभूषण पुरस्कारासह दोन राष्ट्रीय पुरस्कार, 18 फिल्मफेअर पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

     

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *