कित्येक वर्षांपासून मलप्रभा नदीवर पुल खानापूरसाठी पाणीपुरवठा योजना आहे, माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या काळात जांबोटी क्रॉस ते नदीपर्यंतचा रस्ता दोनपदरी करून पथदीप लावण्यात आले, तेंव्हा कुठे गेला होता कायदा अन् तक्रार? मनोहर मुतगेकर यांचा प्रश्न!

खानापूर : लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
खानापूर हेस्कॉम कार्यालय ते मलप्रभा नदीपर्यंतच्या रस्त्यावरील खड्डे येत्या चार दिवसात भरण्याची हमी तालुका बांधकाम विभागाने दिले पण, या रस्त्याचे काम आताच का? रखडले, याआधी अनेकवेळा काम होवूनही आताच ही समस्या का? असे अनेक प्रश्न माजी ग्राम पंचायत सदस्य संघटनेचे उपाध्यक्ष विनायक मुतगेकर यांनी केले उपस्थित केले आहेत. गणेशोत्सवाच्या आधी या रस्त्यावरील खड्डे न भरल्यास उपोषणाचा इशारा देत तालुका बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांची वकील संघटनेचे अध्यक्ष अँड. ईश्वर घाडी यांच्या मार्गदर्शनाखाली भेट घेण्यात आली. यावेळी काँग्रेस नेते यशवंत बिर्जे यांनीही उपस्थित होते. यावेळी बांधकाम खात्याचे तालुका अभियंते संजय गस्ती, अभियंते भरमा यांची भेट घेण्यात आली असता, त्यांनी चार दिवसात सदर रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात येतील अशी हमी नागरिकांना दिली.
विनायक मुतगेकरांचे गंभीर प्रश्न…
हेस्कॉम कार्यालय ते मलप्रभा नदीपर्यंतच्या रस्त्याबद्दल आताच का? तक्रार! याआधी संपूर्ण खानापूर शहरासाठी कित्येक वर्षांपासून सुरू असून त्यासाठी लागणाऱ्या पाण्याची टाकी याच ठिकाणी मलप्रभा नदीत बसविण्यात आली आहे, कित्येक वर्षांपासून येथील पुल (ब्रीज) कशासाठी उभारले, माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या कार्यकाळात हेस्कॉम कार्यालय ते मलप्रभा नदीपर्यंत रस्त्याचे दुपदरीकरण करत पथदिवे लावण्यात आले होते तेंव्हा कोणी तक्रार केली नाही तर आताच का? तक्रार? . हा रस्ता बांधकाम खात्याकडे नोंद नाही तर याआधी या रस्त्याचे अनेकवेळा काम कोणत्या आधारावर केले? . याआधी असलेला रस्ता बांधकाम खात्याने का? खोदला मग? असे अनेक गंभीर प्रश्न विचारतांनाच या रस्त्याचे काम तात्काळ मार्गी न लावल्यास बांधकाम खात्याची लोकायुक्तकडे तक्रार करण्याचा इशारा विनायक मुतगेकर यावेळी दिला. तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष अँड ईश्वर घाडी यांनीही या समस्येची गंभीर दखल घेत रस्त्याची पाहणी करत, वेळ पडल्यास रस्ता रोको करण्याचा इशारा यावेळी दिला.
