October 20, 2026

श्री महालक्ष्मी सोसायटीचे आणखी एक महत्वपूर्ण पाऊल -खानापुरात साकारणार ‘विशेष’ आरोग्य केंद्र!

0
IMG_20260907_020513

श्री महालक्ष्मी मल्टीपर्पज सोसायटीच्या 32 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घोषणा; साडे सहाशे कोटींच्या घरात पोहचली सोसायटीची उलाढाल!

खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

   नेहमीच समाजाच्या विविध सेवा आणि समस्यांसाठी अग्रेसर असणाऱ्या श्री महालक्ष्मी मल्टीपर्पज सोसायटीने (तोपीनकट्टी ता. खानापूर) आणखी एक महत्वपूर्ण पाऊल उचलले असून, तालुक्यातील नागरिकांची हेळसांड पाहून खानापुरात अत्याधुनिक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याचा निर्णय रविवारी तोपीनकट्टी येथील ओम गुरुदेव सिद्धाश्रम मठात पार पडलेल्या श्री महालक्ष्मी मल्टीपर्पज सोसायटीच्या 32 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घेण्यात आला असून, सोसायटीचे संस्थापक -अध्यक्ष , आमदार विठ्ठल हलगेकर यांनी ही घोषणा यावेळी केली. सभेच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. यावेळी व्यवस्थापकांनी संस्थेच्या प्रगतीचा लेखाजोखा मांडला.
पुढे बोलतांना आ. विठ्ठलराव हलगेकर यांनी एक अत्यंत महत्त्वाची घोषणा केली. जनतेचे आरोग्य उत्तम राहावे आणि त्यांना उपचारासाठी खानपूर तालुक्याबाहेर किंवा इतरत्र कुठेही पायपीट करावी लागू नये, यासाठी आगामी काही महिन्यांत खानापूर शहरामध्ये येथे एका अत्याधुनिक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे काम सुरू केले जाणार आहे. सरकारी रुग्णालयासोबतच हे हॉस्पिटल सर्व सुविधायुक्त असेल, ज्याचे पुढील वर्षी अधिकृत उद्घाटन केले जाईल.

(फोटो:उपस्थित सभासद, शेतकरी वर्ग)

संस्थेची आर्थिक उलाढाल पोहचली साडेसहाशेच्या घरात…
यावेळी संस्थेच्या आर्थिक प्रगतीवर प्रकाश टाकताना संस्था प्रमुखांनी स्पष्ट केले की, आज संस्थेची उलाढाल साडेसहाशे कोटी रुपयांच्या घरात पोहोचली आहे. सभासदांनी ठेवलेला विश्वास आणि पैशाचा योग्य वापर हेच या यशाचे रहस्य आहे. सभासदांच्या पैशातून रुग्णालये, शाळा आणि कारखाने उभे करण्यात आले आहेत. संस्थेकडे जमा झालेला निधी कधीही चुकीच्या किंवा दुसऱ्याच्या ताब्यात दिला गेलेला नाही.

यावेळी श्री महालक्ष्मी ग्रुप तोपिनकट्टी संस्थेचे उपाध्यक्ष विठ्ठल करंबळकर, ज्येष्ठ संचालक  चांगाप्पा निलजकर, संचालक  महादेव गुरव, संचालक  नागेश जोगोजी, संचालक नारायण हलगेकर , संचालक  यल्लाप्पा तिरविर, संचालक परशराम खांबले, संचालक  पुंडलिक गुरव, संचालक  बाळगोडा पाटील, संचालक देवेंद्र हूडेडे , संचालक मीनाक्षी बांदिवडेकर , संचालक राजश्री हलगेकर, संचालक पार्वती शहापूरकर , संचालक  रेणुका कोलकार ,जनरल सेक्रेटरी  तुकाराम उंदरे  तसेच आमदार विठ्ठलराव हलकेकरांच्या धर्म पत्नी श्री रुक्मिणी हालगेकर, लैला साखर कारखान्याचे मॅनेज डायरेक्टर सदानंद पाटील, तसेच तालुक्यातील सर्व सोसायट्यांचे सभासद शेतकरी उपस्थीत होते..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *