July 21, 2026

करंजाळ गावच्या विकासासाठी 25 लाखांचा निधी मंजूर: आ.विठ्ठल हलगेकर…

0
IMG_20260427_115105.jpg

करंजाळ ते हालसाल अप्रोच रस्त्यासाठी 20 लाख, तर गावातील कलमेश्वर मंदिरसाठी पाच लाखाचा नदी मंजूर …

    

खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

      आमदार विठ्ठल हलगेकर यांचा विकासाचा धूमधडाका सुरूच आहे, हालसाल परिसरातील करंजाळ गावच्या विकासासाठी 25 लाखांचा भरीव निधी आ.हलगेकर यांनी मंजूर केला असून, करंजाळ ते हालसाल अप्रोच रस्त्यासाठी 20 लाख तर गावातील कलमेश्वर या प्रसिद्ध मंदिरासाठी 5 लाखाचा भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. आज (सोमवार) या दोन्हीं कामांचे भूमिपूजन आमदार विठ्ठल हलगेकर यांच्याहस्ते करण्यात आले. तीनशे मीटर अप्रोच रस्त्यासाठी 20 लाख मंजूर करण्यात आले असून, त्यातून उत्कृष्ट रस्त्याचे काम साकारण्यात येईल, आमदारांच्या हस्ते आज टिकाव मारून या रस्त्याचे  पूजन केले. तसेच गावच्या कलमेश्वर मंदिराची पाहणी करून त्याच्या विकासासाठी 5 लाख निधीची घोषणा यावेळी केली असून, लवकरच या कामाला गती येणार असल्याचेही आमदारांनी यावेळी नागरिकांना सांगितले. यावेळी सुब्राव पाटील, मंजुनाथ मादार, मष्णू रामगन्ना, आलोक पाटील, तुकाराम मुळीक, शांताराम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *