
बांधकाम खात्याचे मंत्री सतीश जार्कीहोळी यांची निवासस्थानी घेतली भेट; तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देण्याची मात्र्यांची ग्वाही…
बेळगांव/ खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
खानापूर शहरातील महत्वाचा रस्ता म्हणून ओळख असलेल्या जुने फिश मार्केट ते नवीन फिश मार्केट रस्त्याचे काम रखडले असल्याने वाहनधारकांची मोठी गैरसोय होत आहे, शिवाय यामुळे शहरातील नागरिकांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. या रस्त्यासाठी आजुबाजूच्या जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना अद्याप भरपाई मिळाली नसून, घोषणा झालेली भरपाई तटपूंजी आहे. तीही तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांची तक्रार आहे, त्यामुळेच या रस्त्याचे काम रखडले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचे पहिल्यांदा म्हणणे ऐकून घेऊन योग्य ती भरपाई शासनाने तत्काळ मिळवून द्यावी अशी सबंधित शेतकऱ्यांची मागणी आहे. त्याची शासनाने पूर्तता करावी, याबाबत आपण पाठपुरावा करा अशी मागणी आमदार विठ्ठल हलगेकर यांनी राज्याचे बांधकाम मंत्री सतीश जार्कीहोळी यांच्याकडे भेट घेऊन केली.
यावेळी बांधकाम मंत्री जार्कीहोळी यांना रस्ता आणि त्यासाठी गेलेल्या जमिनीचे मॅप (नकाशा) दाखवण्यात आला. याची माहिती जाणून घेऊन, तत्काळ सबंधित अधिकाऱ्यांना या समस्यांचे निरसन करण्याचा आदेश देण्यात येईल, नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी शासन सदैव कटिबद्ध असेल अशी हमी मंत्री सतीश जार्कीहोळी यांनी यावेळी दिली. यावेळी राज्य भाग कार्यकारिणी सदस्य प्रमोद कोचेरी, स्थानिक शेतकरी राहुल सावंत यावेळी उपस्थित होते.






Leave a Reply