शिंपेवाडीतील उपलब्ध पाण्यांच्या ठिकाणांचा विकास केल्यास कायमची पाणी समस्या सुटेल: आमदार हलगेकर!


शिंपेवाडीतील पाण्यांच्या ठिकाणांची आमदारांकडून पाहणी; हल्याळ पाटबंधारे अधिकाऱ्यांना तात्काळ येथील समस्या दूर करण्याची सूचना  !

खानापूर:लोकहित न्यूज ( विलास कवठणकर)

           खानापूर तालुक्यात पाण्याच्या नवीन व्यवस्था करून देतांना जुन्या पाणी ठिकाणांकडे सर्वांचेच दुर्लक्ष होतांना दिसत आहे. मात्र, सध्या सर्वत्र पाण्याची पातळी खालावल्याने पाणी मिळणे कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे प्रत्येक गावच्या गावकऱ्यांनी जुन्या पानी ठिकाणांच्या विकासाची मागणी करावी, कारण की, जुन्या पाण्यांच्या ठिकाणांचा विकास केल्यास कायमचीच पाण्याची समस्या दूर होईल, शिंपेवाडीत नाला, विहीरसह जून्या ठिकाणी पाणी असून, त्यांचा विकास केला पाहिजे, यासाठी आम्हीं प्रयत्न करूया असे सांगतानाच हल्याळ येथील पाटबंधारे अधिकाऱ्यांना तात्काळ येथील समस्या सोडवण्याची सूचना आमदार विठ्ठल हलगेकर यांनी यावेळी दिली. आज शिंपेवाडी ( ता. खानापूर) गावच्या पाहणी दौऱ्यावर असतांना उपस्थित नागरिकांसोबत बोलत होते.

     

विहीर, नालासह जुन्या पाणी ठिकाणांची आमदारांकडून पाहणी…

      गावकऱ्यांच्या मागणीनुसार आज आमदार विठ्ठल हलगेकर यांनी शिंपेवाडी गावचा दौरा केला. यावेळी त्यांनी जुन्या विहिरी, नाल्यांसह पाणी ठिकाणांची पाहणी करून गावकऱ्यांसोबत चर्चा केली. यावेळी गावकऱ्यांनी पाण्याची नवीन व्यवस्था उपलब्ध करून द्या, अशी मागणी केली. त्यावर आमदार हलगेकर यांनी येथील जुन्या पाणी ठिकाणांकडे आम्हीं लक्ष दिल्यास नकीच प्रत्येक गावांचा पाणी प्रश्न सुटेल असे त्यांनी सांगितले. लागलीच पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा करत, तत्काळ येथील जुन्या पाणी ठिकाणांचे पुनरुज्जीवन करा अशी सूचना आमदारांनी अधिकाऱ्यांना दिली..

आमदारांचा गावकऱ्यांच्याहस्ते विशेष सत्कार…

    शिंपेवाडी गावच्या विकासासाठी सदैव तत्पर राहणाऱ्या आमदार विठ्ठल हलगेकर यांचा यावेळी गावकऱ्यांच्याहस्ते विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी सुब्राव पाटील, आलोक पाटील, मंजुनाथ मादार, नामदेव पाटील, तुकाराम मुळीक, शांताराम पाटील आदि मान्यवर व गावकरी उपस्थित होते…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *