खानापूर श्री भाग्यलक्ष्मी मल्टी मल्टीपर्पज ची 12 रोजी, 31 वी वार्षिक सभा; पण, सोसायटीला दोन कोटी 87 लाख 111 रुपयेचा ‘तोटा’ चर्चेचा विषय?

0

तालुक्यात नावाजलेली संस्था पण, अलीकडे आपले ‘भाग्य’ शोधते की, काय? हाही चर्चेचा विषय; 12 तारखेच्या…


IMG-20260901-WA0018

तालुक्यात नावाजलेली संस्था पण, अलीकडे आपले ‘भाग्य’ शोधते की, काय? हाही चर्चेचा विषय; 12 तारखेच्या वार्षिक सभेत सभासदांकडून यावर विचारविनिमय होण्याची शक्यता…

खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

     तालुक्यातील महत्वाच्या सोसायट्यांपैकी एक म्हणून खानापूर श्री भाग्यलक्ष्मी मल्टी मल्टीपर्पज सोसायटीची ओळख आहे, पण, या सोसायटीच्या या महिन्यात 12 सप्टेंबरला होणाऱ्या 31 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने एकच प्रश्न उपस्थित होतो आहे, तो म्हणजे या सोसायटीच्या यंदाच्या अहवालामध्ये नोंद केल्यानुसार मागील तोटा म्हणून तब्बल 2 कोटी 87 लाख 111 रुपयेचा तोटा म्हणुन नमूद करण्यात आले आहे, इतका तोटा झाला कसा? ! कोणत्या माध्यमातून हा तोटा झाला, आणि तो कसा भरून काढणार? असा प्रश्न सभासद आणि सुज्ञ नागरिकांना पडला नसेल तर नवलच! तब्बल 31 वर्षे कारकीर्द गाजविलेल्या सोसायटीला इतका मोठा तोटा होत असेल तर तालुक्यातील इतर सोसायट्यांनी काय? अवस्था असेल मग, असाही प्रश्न पडतो, यावर तालुक्यातील इतरही सोसायट्यांमधील सभासद, सुज्ञान नागरिकांनी विचार करणे गरजेचे आहे, कारण, तालुक्यात 40 हून अधिक सोसायट्यांची आर्थिक स्थिती चांगली राहिली नसून, काहीं सोसायट्या बंद होण्याच्या मार्गावर आल्या आहेत. पण, तरीही भाग्यलक्ष्मी मल्टीपर्पज सोसायटीमध्ये अभ्यासू व्यक्तींचा समावेश असून, अध्यक्ष -संचालक आणि माजी संचालक मिळून कोणता कोणता तरी पर्याय काढतील अशीच अपेक्षा या सोसायटीच्या सभासदातून व्यक्त केली जात आहे.

      

स्थानिक माहितीनुसार तात्कालीन भाग्यलक्ष्मी कारखान्याला दोन कोटीच्या घरात कर्ज दिले होते, ते वसूल झाली की, नाही? हा तोच ‘तोटा’ आहे का?

     तात्कालीन भाग्यलक्ष्मी कारखान्याला भाग्यलक्ष्मी मल्टीपर्पज सोसायटीतून दोन कोटींच्या घरात कर्ज दिले होते, ते अद्याप वसूल झाले की, नाही असा प्रश्न उपस्थित होत असतांनाच, तोच हा सोसायटीला तोटा असावा का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. ते कर्ज का? वसूल झाले नाही, त्यानंतर भाग्यलक्ष्मी कारखान्याचा ताबा लैला शुगर्सने घेतला आणि सध्या हा कारखाना महालक्ष्मी ग्रुपचा ताब्यात आहे, त्यामुळे दोन तीन नामकरणे बदलली तरी कर्ज तेच आहे, का? यावर 12 तारखेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत चर्चा करून, सभासद आणि अध्यक्ष संचालक मंडळाने सोसायटीचे ‘भाग्य ‘ अबाधित राखणे गरजेचे आहे, त्यानुसार संचालक मंडळ प्रयत्न करेल अशीच अपेक्षा, कारण सामान्य लोकांसाठी सोसायटी अर्थात सहकार क्षेत्र टिकले पाहिजे असाच नागरिकांचा मतप्रवाह आहे…

    


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed