श्री विठ्ठल नाद; जांबोटी माध्यमिक विद्यालय प्रथम…

0

खानापुरात रावसाहेब वागळे कॉलेज श्री चौराशी देवी संगीत कला मंचतर्फे भजन स्पर्धेचे आयोजन…      खानापूर:लोकहित…


IMG_20260831_222916

खानापुरात रावसाहेब वागळे कॉलेज श्री चौराशी देवी संगीत कला मंचतर्फे भजन स्पर्धेचे आयोजन…

     खानापूर:लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

        खानापूर येथे रावसाहेब वागळे  कॉलेज व  श्री चौरशीदेवी संगीत कला मंच खानापूर यांनी आयोजित केलेल्या विठ्ठल नाद या संगीत भजन स्पर्धेत शालेय गटातून विश्व भारत सेवा समिती संचलित जांबोटीच्या माध्यमिक विद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला. याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. विद्यालयाच्या संघाने अतिशय सुश्राव्य असे गायन व वादन करून उपस्थित  श्रोत्यांची मने जिंकली. या भजन कलापथकात  कू.समर्थ सुतार ,संभव सिताराम सुतार, कु. स्वरा राजकुमार देसाई यांनी गायन केले . तबला साथ कुमार दत्तराज सडेकर यांनी केली तर संवादिनी साथ संभव सुतार या विद्यार्थ्यांची होती. यात दुर्गा दर्शन नाईक, घनश्याम अर्जुन परमेकर, अमृता सुतार, अदिती नाईक, यांचा समावेश होता. संगीत विशारद श्री मशनू चोर्लेकर, साहित्यिक श्री संजीव वाटूपकर, माजी तालुका पंचायत  सभापती मारुती परमेश्वर यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक महेश सडेकर , सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीमती सुजाता चलवेटकर व तुकाराम  सडेकर यांचे मार्गदर्शन लाभले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *