माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील मंगळवारी यांचे निधन..
कोल्हापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
अनेकांचा आधार शिक्षणतज्ञ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तसेच त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालमध्येमध्ये राज्यपालपद भूषविलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील यांचे आज निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. 1935 साली कोल्हापूर जिल्ह्यातील अंबप गावांमध्ये त्यांचा जन्म झाला होता. त्यांना जेष्ठ शिक्षकतज्ञ म्हणून ओळखले जात असून, त्यांच्या नावे महाराष्ट्रात त्यांच्या नावे अनेक शिक्षण संस्था, विद्यापीठे स्थापन झाली आहेत. 1991 साली त्यांना भारत सरकारचा पद्मश्री हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
असा होता त्यांचा राजकीय प्रवास….
1957 ते 1962 साली ते कोल्हापूर महानगरपालिकेचे महापौर होते. 1967 ते 1972 साली पन्हाळा विधानसभा भागाचे ते आमदार झाले. शिक्षण, राजकारण आणि सहकार क्षेत्रातील एक धुरंदर नेतृत्व म्हणून त्यांच्या देशभर ओळख आहे. त्यामुळे त्यांच्या नावे मैदाने, शिक्षण संस्था महाराष्ट्रात कार्यरत असून, लाखो गोरगरीब विद्यार्थी तेथुन घडताहेत…