केंद्र सरकारची देशप्रेम मोहीम देशभर राबविणार….
खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
सोमवार 10 ते बुधवार दि.14 ऑगस्टला तिरंगा रॅली, तर 10 ते 13 दरम्यान ‘हर घर तिरंगा’ ध्वज मोहीम जोरदार राबविण्याची योजना आमदार विठ्ठल हलगेकर यांनी आखली आहे , आजच्या तरुण पिढीला देश स्वातंत्र्याचे महत्त्व कळावे, देशवासीयांचे देशाबद्दलचे प्रेम अधिकच फुलून यावे या दृष्टीने केंद्र सरकारने हर घर तिरंगा ध्वज मोहीम राबविली आहे, त्याला देशभरातून बऱ्यापैकी प्रतिसाद मिळतांना दिसत आहे. खानापुरातही या मोहिमेला उत्तम प्रतिसाद मिळणार या उद्देशाने आमदार हलगेकर यांनी ही मोहिम हाती घेतली असून, त्याला नक्कीच उत्तम प्रतिसाद लाभेल असा विश्वास आमदारांनी लोकहित न्यूजशी बोलतांना व्यक्त केला.
आमदारांचे आवाहन…
आपल्या घरी आंभिमानाने तिरंगा फडकावून ध्वजासोबत आपली फोटो सेल्फी काढून सेल्फी विथ तिरंगा ह्यासटॅग वर अपलोड करा. आपण अपलोड केलेल्या फोटोवर वंदे मातरम् प्ले होईल, असे आवाहन आमदार विठ्ठल हलगेकर यांनी केले आहे…