पोलिस अमली पदार्थ विरोधी मोहिमेला आमचा पाठिंबा असेल: आमदार विठ्ठल हलगेकर…

0

खानापुरात अमली पदार्थ विरोधी पोलिस आणि आरोग्य खात्याकडून जनजागृती; डीवायएसपी डॉ.वीरेय्या हिरेमठ, तहसीलदार दुण्डप्पा कोमल,…


IMG_20260730_032045

Oplus_16908288




खानापुरात अमली पदार्थ विरोधी पोलिस आणि आरोग्य खात्याकडून जनजागृती; डीवायएसपी डॉ.वीरेय्या हिरेमठ, तहसीलदार दुण्डप्पा कोमल, कॉलेज प्राचार्यांची विशेष उपस्थिती..

खानापूर:  लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
तालुक्यात दारू गुटखासह, गांजा, सिगारेटची वाढती व्यसनाधिनता आज चिंतनाचा विषय बनला आहे, परिणामी शेकडो युवक -युवती विविध व्यसनांच्या आहारी जाण्याची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे, त्यावर नियंत्रण आणणे हेच आपले सर्वांचे कर्तव्य असेल असे आवाहन आमदार विठ्ठल हलगेकर यांनी बोलतांना केले. पोलिसांनी राबविलेल्या प्रत्येक मोहिमेला आमचा कायम पाठिंबा असेल असेही ते पुढे बोलतांना म्हणाले. बुधवारी खानापुरात अमली पदार्थ विरोधी मोहिमेतील भाग म्हणून अमली पदार्थ विरोधी जागृती करावी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी आमदार प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बैलहोंगल विभागाचे डीवायएसपी डॉ. विरेया हिरेमठ होते. प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार दुण्डप्पा कोमार, आरोग्य खात्याच्या महानंदा परिश्वाड , महाविद्यालयाचे प्राचार्य वाय . एच. अनगोळकर यांनी उपस्थित होत.
यावेळी खानापूरचे पीआय एल. एच. गवंडी यांनी स्वागत केले. प्रमुख वक्ते म्हणून बोलतांना वासुदेव चौगुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज, माजी दिवंगत राष्ट्रपती डॉ. एपी .जे.अब्दुल कलाम भगतसिंग यांचासारख्या महान पुरुष्यांचा आदर्श समीर ठेवून, पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रत्यक्षातील अनुभव जीवन सुखकर बनवतात असे नमूद केले.

यावेळी बोलतांना तहसीलदार दुण्डप्पा कोमार यांनी व्यसनाच्या आहारी जाणे म्हणजे जणू काहीं एक कुटुंब त्रासलेल्या अवस्थेत जाण्यासारखेच आहे, युवकांनी कुटुंबांचा विचार करून व्यसनमुक्तीकडे वाटचाल करावी असे आवाहन केले.

डीवायएसपी डॉ विरेय्या हिरेमठ यांनी विद्यार्थांकडून विद्यार्थांकडून घेतली व्यसनमुक्तीची शपथ..
यावेळी बैलहोंगल विभागाचे डीवायएसपी डॉ विरेय्या हिरेमठ यांनी यावेळी उपस्थित असलेल्या शेकडो  विद्यार्थांकडून व्यसनमुक्तीची शपथ घेतली. व्यसनमुक्तीच्या आहारी कधीही नाही जाणार अशीच शपथ श्री. हिरेमठ यांनी दिली. यावेळी बोलतांना डॉ.विरेया हिरेमठ यांनी सांगितले की,15 ते 35 वयोगटापर्यंतची युवा पिढी गांजा, सिगारेट दारूसारख्या व्यसनाच्या आहारी जात असून, त्याविरोधात पोलिसांकडून मोहीम राबविण्यात येत आहे, त्याला नागरिकांनीही प्रतिसाद दिला पाहिजे असेही सांगितले. यावेळी पीएसआय निरंजन स्वामी व त्यांचे सहकारी उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed