पुणे -बंगळूर  निपाणीनजीक महामार्ग बांधकाम कोसळले ; लाखोंच्या कमिशनसाठी ‘कोटींचे जीव’ धोक्यात?

0

कोणतीही जीवितहानी घडली असती तर जबाबदार कोण?निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करण्याची गरज    निपाणी: लोकहित…


Screenshot_2026-07-29-14-55-01-67_6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7

कोणतीही जीवितहानी घडली असती तर जबाबदार कोण?निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करण्याची गरज

   निपाणी: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

        केंद्र सरकारच्या अधिकाराखाली येणाऱ्या पुणे – बंगळूर महामार्गावरील निपाणी येथील महात्मा गांधी रुग्णालयाजवळ रस्त्याचे बांधकाम अचानक कोसळल्याने सुदैवाने अनर्थ टाळला, असला तरी निकृष्ट बांधकामाचा दर्जा बाहेर आला आहे, लाखोंच्या कमिशनसाठी महामार्गाने जाणारे कोटींचे प्रवाशांचे जीव धोक्यात जाण्याची प्रवासातून व्यक्त केली जात आहे. केंद्र सरकारने तत्काळ अशा निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

      माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळातील रस्ते, महामार्ग अद्यापही सुस्थित असतांना अलीकडच्या दहा वर्षातील केंद्र सरकारच्या कामांचा दर्जा इतका कसा घसरला? याला कमिशन जबाबदार की, मंत्र्यांचा आशीर्वाद? असा प्रश्न प्रवासातून उपस्थित केला जात आहे. मागच्या वेळी नांदेडमधील असाच रस्ता पूल कोसळला अन् कोटींचा शासकीय निधी वाया गेला आहे.

    

महामार्गावरून लाखों वाहने दररोज धावतात; अशा घटना घडल्या तर या जबाबदार कोण?

     बंगळूर बेळगांव कोल्हापूर- पुणे महामार्गावरून दररोज लाखों वाहने धावतात, त्यात अवजड वाहनांचा अधिक प्रमाणात समावेश असतो, अशा घटना घडून त्यात कोणतीही जीवितहानी झाल्यास त्याला जबाबदार कोण? संतप्त सवाल प्रवाशी वर्गातून केला जात आहे. तात्काळ वरिष्ठ अधिकारी आणि केंद्रीय अवजड आणि रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी यांनी यात गांभीर्याने लक्ष घालून याप्रकरणाची चौकशी करावी अशीही मागणी जात धरू लागली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed