Oplus_16908288
तोपीनकट्टी महालक्ष्मी बहुउद्देशीय कृषी पत्तीन संघाला 2025-26 ते 2028-2029 साठी संघ आणि खुद्द आमदार विठ्ठल हलगेकर यांनीही खानापूर डीसीसी बँकेशी अनेकवेळा पत्रव्यवहार करूनही अद्याप एन. सी कर्ज अद्याप मिळू शकलेले नाही, याचे कारण,अद्याप कळू शकले नाही असे आ. हलगेकर यांनी ‘लोकहित न्यूज’ शी बोलतांना स्पष्ट केले.
-लोकहित सहकार न्यूज –
खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
शेतकरी वर्गाला आर्थिक सहाय्य व्हावे म्हणून बिनव्याजी कृषी पत्तीन संघाची सरकारच्या सहकार खात्याने स्थापना केली आहे, त्यामुळे बहुतेक ठिकाणी शेतकऱ्यांना याचा मोठा आधार मिळाला असला तरी, काहीं संघाना 2025पासून ते चालू वर्षात एन.सी (पत) कर्ज डीसीसी बँकेकडून दिलेच नसल्याने तेथील शेतकऱ्यांनी करावे तरी काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. 2005 पासून ते 2025 पर्यंत शंभर टक्के कर्ज वसुली असतांनाही खुद्द!’आमदार विठ्ठल हलगेकर’ यांचा संघ असलेल्या तोपीनकट्टी (ता. खानापूर) महालक्ष्मी बहुउद्देशीय कृषी पत्तीन संघाला 2025 ते 2028 -2029 पर्यंतचे एन. सी (पत) कर्ज अद्यापही मिळालेच नाही, यासाठी संबंधित संघाने व खुद्द आमदारांनीही अनेकवेळा डीसीसी बँकेशी पत्रव्यवहार करूनही कोणतीच दखल घेतली जात नाही, याचे कारण काय? असा प्रश्न विचारण्यात येत असून, येत्या पंधरा दिवसांत याची पूर्तता न झाल्यास संबंधित संघाचा आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या नेतृत्वाखाली डीसीसी बँकेवर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे. खुद्द आमदारांच्या संघाला ‘पत ‘ मिळत नसेल तर ‘ इतरांचे ‘ काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आमदार म्हणतात, आणखी काहीं संघांचीही अशीच अवस्था; हा निवडणूक राजकीय’ राग’ की, बँकेची कोणती तांत्रिक अडचण?..
खानापुरातील गेले डीसीसी निवडणूक राजकारण राज्यस्तरीय रंगले होते, त्याच रागातून आमदारांच्या तोपीनकट्टी कृषी पत्तीन संघासह जय हनुमान हब्बनहट्टी कृषी पत्तीन संघाचा स्थापनेपासून अनेकवेळा पत्रव्यवहार करूनही डीसीसी बँकेकडून शेअर्स करून घेण्यात आलेला नाही, याचे काय कारण आहे हे अद्याप समजू शकलेले नाही. वाटरे कृषी पत्तीन संघाचीही अशीच अवस्था आहे, त्यामुळे मागच्या डीसीसी बँक निवडणूक राजकारण रागातून म्हणावे की, बँकेची कोणती तांत्रिक अडचण आहे हे अद्याप आम्हाला समजू शकलेले नसल्याची प्रतिक्रिया आमदार विठ्ठल हलगेकर यांनी ‘लोकहित न्यूज’ शी बोलतांना दिली. आमचे – आमचे काय तरी राजकीय असेल,पण यात शेतकऱ्यांचा काय दोष असाही प्रश्न त्यांनी पुढे बोलतांना उपस्थित केला आहे.
खानापूर डीसीसी बँकेला तोपीनकट्टी कृषी पत्तीन संदर्भात आमदारांनी दिलेल्या कन्नड भाषेतील पत्राचा ममराठीत अनुवाद!
मा. संबंधित अधिकारी,
विषय : महालक्ष्मी विविध उद्देशीय प्राथमिक कृषी सहकारी संस्थेस एन.सी. कर्ज (पत) मंजुरीबाबत.
महालक्ष्मी विविध उद्देशीय प्राथमिक कृषी सहकारी संस्था मर्यादित, तोटीगाळी, ता. खानापूर ही संस्था दिनांक 01.08.2005 रोजी स्थापन झाली आहे.
सन 2005 ते 2024 या कालावधीत संस्थेकडून वितरित करण्यात आलेल्या कर्जाची 100 टक्के वसुली करण्यात आली आहे. तसेच सन 2005 ते 2023 या कालावधीत बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून (डी.सी.सी. बँक) संस्थेला एन.सी. कर्ज (पत) मंजूर करण्यात आले होते.
परंतु सन 2025-26 ते 2028-29 या कालावधीसाठी संस्थेच्या सभासदांना कर्जपुरवठा करण्यासाठी आवश्यक असलेले सर्व उतारे व कागदपत्रे जिल्हा डी.सी.सी. बँकेने तपासूनही, संबंधित बँकेच्या निरीक्षकांकडून या कालावधीसाठी एन.सी. कर्ज (पत) मंजुरीबाबत पुढील कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.
यामुळे संस्थेचे सचिव तसेच सभासदांनी, मी सदर संस्थेचा अध्यक्ष असल्याने, एन.सी. कर्ज (पत) तात्काळ मंजूर करून देण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली आहे.
तरीही, सदर एन.सी. कर्ज (पत) मंजुरीस विलंब का होत आहे, याची कारणमीमांसा व सविस्तर लेखी स्पष्टीकरण द्यावे, अशी आपणांस नम्र विनंती आहे.
आपला विश्वासू,
(विठ्ठल सोमण्णा हलगेकर)