Oplus_16908288
नागरिकांचा प्रश्न; तोराळीवाड्यातील सुरेश पाटील, दत्तू पाटील यांची पंचायतीकडे तक्रार…
तोराळी: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
यंदा गटार स्वच्छता झाली नसतांनाच असलेली गटारीही काही लोकांनी बुजविल्याने तेथून गटारी बंद झाल्याने घरात पाणी शिरत आहे, असे असतांना अनेकवेळा तक्रार करूनही गोल्याळी पंचायत पंचायत दाद देईना, त्यामुळे पंचायत आहे का? जागेवर असा संतप्त सवाल सुरेश पाटील यांनी लोकहित न्यूज शी बोलतांना केला आहे. पंचायतीला तक्रार अर्ज देऊनही पंचायतीची डोळेझाक झाल्याचा आरोप येथील प्रतिष्ठित नागरिक दत्तू पाटील यांनी केला आहे. गटारी स्वच्छता नाही, असलेल्या गटारीची देखभाल करता येत नाही तर पंचायत करते तरी काय? आमच्या गावातील समस्या पंचायत वेळेत सोडवत नाही, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याचा पाठपुरावा करून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.
प्रतिक्रिया –
मी पंचायतीला अर्ज देऊनही कोणताच प्रतिसाद मिळत नाही. येत्या दोन दिवसांत ही समस्या सुटली नाही तर पुढे जाऊ. पुढच्या माणसांनी गटारी बंद केल्याने आमच्या घरात पाणी शिरत आहे, याची पंचायतकडून अद्याप साधी पाहणीही झालेली नाही असेही त्यांनी पुढे सांगितले.
आज तोराळीत जाऊन समस्या जाणून घेऊन तात्काळ सोडवू अशी हमी पिडीओ आनंद भिंगे यांनी लोकहित न्यूज शी बोलतांना दिली.
