खानापुरातील ‘बुडीत सोसायट्यांविरोधात’ ठेवीदार करणार डीसिंकडे तक्रार…

0

लोकहित न्यूजच्या वृत्ताचा मोठा आधार झाल्याचे ठेवीदारांचे मत; गडगंज लोकांनी आणि संचालकांच्या जवळच्या ठेवीदारांनी आपल्या…


IMG_20260728_083018

Oplus_16908288




लोकहित न्यूजच्या वृत्ताचा मोठा आधार झाल्याचे ठेवीदारांचे मत; गडगंज लोकांनी आणि संचालकांच्या जवळच्या ठेवीदारांनी आपल्या रखमा घेतल्या काढून, सामन्यांचे काय?

अशा सोसायट्यांचे करायचे काय भाग- 3

खानापूर:  लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
खानापुरातील बुडलेल्या किंवा अन्य शेवटची घटका मोजत असलेल्या सोसायट्यांमध्ये अडकलेल्या ठेवींबाबत नागरिक चांगलेच जागृत झाले असून, त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अशा सोसायट्यांविरोधात तक्रार करण्याचा निर्णय घेतला असल्याची ठेवीदारांतून मिळत आहे. ‘लोकहित न्यूज’ ने प्रसिद्ध केलेल्या वृत्त मालिकेचा चांगलाच ‘सपोट ‘ मिळाला असून, त्याआधारे नागरिकांतून आवाज उठवण्यात येणार आहे. आम्ही गेल्या तीन वर्षांपासून या सोसायट्यांकडे हेलपाटे मारतोय कोणताच प्रतिसाद मिळत नाही, काय झाले आमच्या पैशांचे? असाही प्रश्न ठेवीदारांतून उपस्थित केला जात आहे.

कोण तो?मॅनेजर शेअर मार्केटिंग गुंतवणूकदार? त्याला कोण पाठीशी घालते? संचालक -अध्यक्ष यावेळी कुठे होते…
   लोकांच्या पैशांवर बहुतेक ठिकाणी अध्यक्ष -उपाध्यक्ष आणि संचालक ‘मालामाल ‘ झाल्याचे वृत्त असतांनाच, आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर येत आहे, ती म्हणजे चक्क यातील एका सोसायटी मॅनेजरने शेअर मार्केटिंगमध्ये स्वतःसाठी लोकांचे लाखों रुपये लावल्याची माहिती नागरिकांतून पुढे येत आहे, याबद्दल ‘लोकहित न्यूजकडे लवकरच अधिकृत माहिती उपलब्ध होईल, ती वाचनांकसमोर प्रसिद्ध केली जाईल. लोकांचे पैसे शेअर मार्केटमध्ये लोकांचे पैसे लावलेच कसे? आणि त्यांना अशा पुण्य कामासाठी कोणी पाठीशी घातले हा चिंतनाचा विषय आहे. आता मात्र, त्या मॅनेजरला लपवता लपवता नाके नऊ वाजत असल्याचे चित्र आहे. इतके मोठे धाडस तुम्हीं त्यावेळी केला तर मग आता तुमची हाताची घडी का? आता तसेच धाडस करून, परत करा आमच्या ठेवी अशीच मागणी नागरिकांतून केली जात आहे.

काहीं कर्जे वसूल करूनही ठेवीदारांना त्यांच्या ठेवी मिळाल्याच नाहीत…
यातील काहीं सोसायट्यांच्या निकटवर्तीयांनी काहीं कर्जे वसूल करूनही ठेवीदारांना त्यांच्या ठेवी मिळाल्याच नसल्याचे नागरिक सांगतात, त्यामुळे वसूल केलेले पैसे गेले कुठे? कुणाच्या खिशात असा प्रश्न ठेवीदारांतून विचारला जात आहे.

सोसायट्या बुडवून समाजात ‘तो मी नव्हेच सारखे’ कसे फिरता ? ठेवीदारांचा संतप्त सवाल..
गोरगरीब नागरिकांच्या घामाचे पैसे तुमच्या चैनी आणि प्लॉट घेण्यासाठी वापरून तुम्हीं गडगंज झाला आमच्या पैशांचे काय? तरीही तुम्हीं ‘तो मी नव्हेच’ सारखे
समाजात फिरता, तुम्हांला काहीच वाटत नाही का? असा संतप्त सवाल करत, आता आम्ही गप्प बसणार नाही, आवाज उठवणारच अशी भूमिका ठेवीदारांनी घेतल्याची माहिती श्रीरामसेना हिंदुस्थान माडीगुंजी शाखेचे अध्यक्ष पंकज सावंत यांनी लोकहित न्यूज शी बोलतांना दिली.

(उद्याच्या भागात जांबोटी भागातील सोसाट्यांवर ‘प्रकाश ‘)


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed