तालुक्याचे ‘चाणक्य ‘ श्री. सदानंद पाटील…
एमडी म्हणूनही जिल्हाभर प्रसिद्ध;तालुक्याचा सर्वांगीण विकास हेच ध्येय, तालुक्याची जीवनदायीनी लैला ( महालक्ष्मी ग्रुप ) शुगर्सचा उत्तम पद्धतीने गाडा हाकणारे ‘ कृष्ण ‘..
श्री. सदानंद पाटील, एमडी लैला (महालक्ष्मी ग्रुप) शुगर्स वाढदिवस विशेष…
संपादक : विलास कवठणकर, सोमवार दि.2 7 जुलै 2026.
खानापूर : लोकहित न्यूज (विलास कवठणकर )
तालुक्यातील तळागळातील प्रत्येक नागरिकाला प्रेमाणे सोबत घेत, त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या तितक्याच समाधानकारक पद्धतीने सोडवणे, राहणे साधे असले तरी विचार मोठे असलेले व्यक्तीमत्व म्हणून लैला शुगर्स (महालक्ष्मी ग्रुप ) चे एमडी, जिल्हा भाजप रयत मोर्चा अध्यक्ष, उच्च शिक्षित अभियंते म्हणून श्री. सदानंद मारुती पाटील यांची ओळख निर्माण झाली आहे. तालुक्याचे चाणक्य म्हणूनही त्यांना ओळखले जाते, अशा अभ्यासू व्यक्तिमत्वाच्या जीवनातील महत्वाच्या दिनी अर्थात वाढदिवसानिमित्त जिल्ह्यातून शुभेछ्यांचा वर्षाव होत आहे. अशा कुशल आभासू श्री. सदानंद पाटील यांना लोकहित न्यूज तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐💐
अशा कर्तृत्ववान, अभ्यासू, कर्तव्यदक्ष आणि समाजसेवेचा अखंड वसा जपणाव्या मा. सदानंद मारूती पाटील यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! त्यांना उत्तम आरोग्य, दीर्धायुष्य आणि निरंतर यश लाभो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना!
…महत्वाच्या पदांचे ते ‘सारथी ‘…
-तालुक्याची आर्थिक जीवनदायीनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लैला शुगर्स ( महालक्ष्मी ग्रुप ) चे ते ‘एमडी’ अर्थात व्यवस्थापकीय संचालक या महत्वाच्या पदावर विराजमान आहेत.
शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी भाजप पक्षाने त्यांच्यावर जिल्हा भाजप ‘रयत मोर्चा उपाध्यक्ष’ पदाची जबाबदारी सोपवली आहे, ती ते अति उत्तम पद्धतीने हाताळत आहेत.
आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या अनुपस्थितीत तालुक्यातील प्रत्येक गावचा कार्यक्रम आणि समस्येमध्ये सहभागी होऊन, सदर समस्या उत्तमप्रमाणे हाताळण्यास त्यांचा हातकंडा राहिला आहे.
-उत्तम मार्गदर्शक, सल्लागार म्हणूनही परिचित…
प्राथमिक शिक्षण मराठीत ते जी. एस. एस कॉलेजध्ये प्राध्यापक म्हणून सेवा बजावली.
खानापूर तालुक्यातील खानापूर शहरापासून अवच्या दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या विदरभावी या गावात मा. सदानंद मारूती पाटील यांचा जन्म झाला. त्यांचे प्राथ.शिक्षण इयत्ता पहिली ते पाचवीपर्यतचे शिक्षण पार पडले. तर इयत्ता सहावी ते दहावीपर्येत तोपीनकट्टी येथे झाले. त्यानंतर त्यांनी मराठा मंडळ पॉलिटेकनिक , बेळगाव येथे सिव्हिल इंजिनिअरिगमध्ये डिप्लोमा पदवी पूर्ण केली. पुढे जी.आय.टी. कॉलेज, बेळगाव येथून सिव्हिल इंजिनिअरिगची पदवी प्राप्त केली आणि एम.एस. रामव्या विद्यापीठ, बंगळूर येथून उच्च शिक्षण पूर्ण केले, हे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी एल अ्ड टी. कॉन्ट्रॅकशन कंपनीमध्ये दोन वर्षें काम केले. त्यानंतर ज्या जी.आय.टी. कॉलेज,. बेळगावमध्ये त्यांनी शिक्षण घेत, त्याच कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून सेवा बजावली आहे. उत्कृष्ठ सिव्हिल इंजिनिअर व आकिंटेक्ट म्हणूनही त्यांची ओळख असून, त्यांच्या मार्गदर्शसनातून अनेक भव्य इमारती व उंच टॉवर्स उभारण्यात आले आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये संघटक म्हणून त्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली. त्यामुळे त्यांनी याच माध्यमातून समाजसेवेचा वसा जपला. आणि त्यानंतर त्यांनी आपल्या जीवनाची ‘किक’ राजकारण आणि समाजकारणात घेतली. अर्थात काय तर त्यांच्या कुशाग्र आणि अभ्यासू व्यक्तिमत्वाची दखल घेत, खानापूरचे लोकप्रिय आमदार मा. विठ्ठल सोमन्ना हलगेकर यांनी लैला शुगर्स (महालक्षमी साखर कारखाना, तोपिनकट्टी) व्यवस्थापकीय संचालक (एमडी) पदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. उत्तमप्रकारे काम करत तीही जबावदारी त्यांनी अनेक वर्षे यशस्वीरित्या पार पाडत आज कारखान्यांच्या प्रगतीपथावर आणला आहे, याकाळात कालपर्यन्त कारखान्याबाबतीत अनेक अडचणी आल्या तरी त्यांनी त्या उत्तम प्रकारे हाताळल्या आहेत.

तालुक्याच्या विकास, समस्या आणि धार्मिक कार्यक्रमात विशेष उवस्थिती…
मा. सदानंद मारुती पाटील है खानापूर तालुक्यातील जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सदैव पुढाकार घेणारे लोकप्रिय व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. आमदार मा. विठ्ठल हलगेकर यांच्या मार्गदर्शन व सूचनेनुसार तालुक्यातील रस्ते, वीज, पिण्यांचे पाणी, शाळा, महाविद्यालये, क्रीडा सविधा, बससेवा, ग्रामविकास, बैलगाडी शर्यती, क्रिकेट स्था, हंद्र सभोचे आयोजन तसेच विविध सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि वैयक्तिक कार्यक्रमांमध्ये त्यांची विशेष उपस्थिती लक्षणीय असते.
श्री सदानंद पाटील यांच्या संकल्पनेतून रक्तदान शिबिरातून अनेकांना ‘जीवनदान’…
लैला संचलित महालक्ष्मी साखर कारखान्याच्या माध्यमातून मा. सदानंद मारुती पाटील यांघ्या नेतुत्वखाली अधिकारी व कर्मचान्यांच्या सहभगातून अनेक रक्तदान शिबीरे भरवून, अनेकांना जीवनदान देत, रक्तदान हे श्रेष्टदान आहे,असं त्यांनी समाजाला पटवून दिले आहे.
त्यांच्या आजच्या वाढदिनी खानापूर तालुकावासीयांच्यावतीने भारतीय जनता पार्टी खानापूर तालुका लैला संचलित महालक्ष्मी साखर कारखान्यांच्यावतीने एमडी सदानंद पाटील यांना वाढदिवसाच्या 💐💐खूप खूप शुभेच्छा!