दुपारी पूजा, होम हवन प्रसादाचे आयोजन; हॉटेल मालक शंकर सडेकर यांच्याकडून सर्वांनाच आग्रहाचे ‘आमंत्रण ‘!
जांबोटी : लोकहित न्यूज (विलास कवठणकर )
जांबोटी बसस्थानक जणू ‘खानावळी हब्ब ‘ बनले आहे. याठिकाणी एकापेक्षा हॉटेल्स असतांनाही त्यात आता आणखी एका चावीष्ठ हॉटेलची भर पडली आहे. आधीच्या हॉटेल विष्णू’च्या ठिकाणी हॉटेल ‘जांबोटी वाडा ‘ या नवीन हॉटेलची आजपासून भर पडत आहे. जांबोटी -चोर्ला मार्गावर असलेल्या या हॉटेलचे आज दुपारी थाटात ‘ओपनिंग’ होणार असून, दुपारी -पूजा, होमवण, प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी गावातील सर्व नागरिक, आमंत्रित सर्व मित्र पाहुणे मंडळींनी उपस्थीत रहावे, असे आग्रहाचे आमंत्रण हॉटेलचे मालक तथा पीएलडी बँकेचे संचालक व माजी ग्राम पंचायत सदस्य शंकर विष्णू सडेकर यांनी ‘लोकहित न्यूज’ च्या माध्यमातून दिले आहे.

जांबोटी चोर्ला रोडवरच हॉटेल…
जांबोटी – चोर्ला रोडवरच हे हॉटेल असून,प्रवाशांचे ते जवळचे ठरणार आहे. भविष्यात या ठिकाणी अनेक नवनवीन सुविधा उपलब्ध असतील अशी माहिती शंकर सडेकर यांनी ‘लोकहीत न्यूज शी’ बोलतांना दिली.