आंदोलकावरील गुन्हें मागे घेत, आत्महत्या केलेल्या विध्यार्थ्यांच्या कुटुंबियांना भरपाईही सरकार देणार..
नवीदिल्ली : लोकहीत न्यूज नेटवर्क ( विलास कवठणकर)
सेजीपी यांचे आंदोलन आणि पर्यावरणप्रेमी सोनम वांगचूक यांच्या महिनाभराच्या उपोषणाला मोठे यश आले असून, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता सेजीपीने सरकारसमोर ठेवलेल्या मागण्याही सरकारने मान्य केल्या आहेत. नीट परीक्षा पेपर फु्टीमुळे संतप्त 11 विध्यार्थांनी आत्महत्या केल्या आहेत, त्या सर्व विध्यार्थ्यांच्या कुटुंबियांना भरपाईची मागणी, तसेच आंदोलकांवर झालेले गुन्हें मागे घेण्याची अट सेजीपीने ठेवली होती. त्या दोन्हीं मागण्या मान्य करत, यापुढे नीट परीक्षेबाबत कोणताही हलगर्जीपणा होणार नसल्याचा विश्वासही सरकारच्यावतीने केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी सरकारतर्फे पत्रकार परिषदेत आज दिला.
दिल्लीत पार पडलेल्या या पत्रकार परिषदेत सरकारकडून जितेंद्र सिंह तर सेजीपीतर्फे राष्ट्रीय प्रवक्ते सौरव दास व आशुतोष रांका उवस्थित होते.
सरकारचे सकारात्मक पाऊल…
उशिरा का असेना, सरकारने सकारात्मक पाऊल टाकले असून, देशावासियांकडून तसेच विध्यार्थ्यांकडून स्वागत होत आहे, आंदोलकांनीही या मुद्याचा बाऊ करू नये असाच मतप्रवाह व्यक्त होतांना दिसत आहे..