ग्राम पंचायत सदस्य संघटनेचे उपाध्यक्ष विनायक मुतगेकर यांच्या नेतृत्वाखाली निलावडे, बांदेकरवाडा परिसरातील शेतकऱ्यांनी घेतली डीएफओंची भेट…
बेळगांव: लोकहित न्यूज
खानापूर तालुक्याच्या निलावडे बांदेकरवाडा परिसरात गेल्या दोन आठवड्यांपासून ठाण मांडलेल्या हत्तीने तर दुसरीकडे गवीरेड्याच्या कळपाने ऊस, केळी, भात पिकाची मोठी नुकसान केली आहे. दरवर्षी हत्ती याच भागात नेमका येतो अन् परत जाण्याचे नावच घेत नाही. यंदाही अशीच परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. एरवी शेतकऱ्यांच्या बाबतीत वनखाते इतर नियम अधिक कडक लावते तेच दुसरीकडे हत्ती, गवीरेड्यांकडून होणाऱ्या नुकसानीची भरपाई मात्र, तात्पुंजी दिली जाते. त्यामुळे अशावेळी कोठे जातो हा कडक कायदा? असा सवाल उपस्थित होत आहे. यावेळी तरी वनखात्याने नुकसानीप्रमाणे भरपाई द्यावी या मागणीसाठी आज ग्राम पंचायत सदस्य संघटनेचे उपाध्यक्ष विनायक मुतगेकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा वनरक्षणाधिकारी (डीएफओंची) निलावडे बांदेकरवाडा परिसरातील शेतकऱ्यांनी भेट घेतली. यावेळी या समस्येबाबत बराच वेळ चर्चा करण्यात आली. यावेळी रेंजर श्रीकांत पाटील, एसीएफ सुनीता निंबरगी यांच्याकडूनही डीएफओंनी माहिती घेतली. यावेळी परिसरातील शेतकरी उपस्थित होते.







Leave a Reply