July 21, 2026

रामराजन बेळगावचे नवे एसपी; भीमाशंकर गुळेद यांची बदली…

0
IMG_20260101_065941.jpg

नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला नूतन जिल्हा पोलिसप्रमुखांपुढे नवीन आव्हाने…

बेळगांव: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

    राज्यातील काहीं आयपीएस, डीवायएसपी, पोलिस निरीक्षकांसह अधिकाऱ्यांच्या बदलीचे सत्र राज्य सरकारने हाती घेतले आहे. त्यानुसार बेळगावचे जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांची इकॉनॉमिक डीआयजी या पदावर बढती देण्यात आली असून, त्यांच्या जागी रामराजन यांची बेळगावचे नवे एसपी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे नव्या एसपिंसमोर कायदा आणि सुव्यवस्थेबाबत अनेक आव्हाने असतील..

राज्यात अवैद्य धंदे वाढले; बंगळूरच्या ड्रग्स घटनेने राज्य पोलिसांवर नामुष्कीची वेळ?

      परवा परवा महाराष्ट्राच्या विशेष पोलिस पथकाने राजधानी बंगळूरमध्ये कोटींचे ड्रग्स जप्त करतानाच तेथील फॅक्टवारऱ्याही नष्ट केल्या आहेत. महाराष्ट्र पोलिस येऊन आपल्या राज्यात धडक कारवाई करतात तर मग स्थानिक पोलिस काय? करत आहेत असाच प्रश्न राज्य सरकारला पडला अन् गृह मंत्री डॉ. जी. पी. परमेश्वर यांनी तात्काळ याची चौकशी करण्याची सूचना राज्य पोलिसांना दिली आहे. त्याच पार्श्वभूमीवर बेळगावचे नवे एसपी रामराजन यांच्यासमोरही बेळगावच्या कायदासुव्यवस्थेचे मोठे आव्हान असेल..

     


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *