
यात्रांसह, धार्मिक कार्यक्रमांना सुरळीत विद्युत पुरवठा करा; हेस्कॉमकडे निवेदनाव्दारे मागणी…
खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
आधीच संपूर्णतः जंगलप्रदेशाने व्यापलेल्या खानापूर तालुक्यात रस्त्यासह अनेक बाबतीत विकास साधण्यास अडचणी येतात. त्यात पावसाळ्यात जंगलप्रदेशातून जाणाऱ्या विद्युत पुरवठ्यात झाडांच्या वारंवार अडचणी येतात. त्यामुळे जांबोटी, लोंढा, गर्लगुंजीसह तालुक्यात पंधरा पंधरा दिवस वीज खंडीत होत असतो. त्यामुळे नागरिकांना अंधारातच दिवस काढावे लागतात शिवाय शाळकरी विद्यार्थ्यांना अभ्यास करतांना फटका बसतो, त्यात विद्युत सेवेची दुरुस्ती करण्यास अधिकच दिवस जातात, त्यामुळे अंधाराचा मुक्काम वाढतो, या भविष्यात सर्व समस्या टाळण्यासाठी आतापासूनच जंगल भागासह ज्या ज्या भागात झाडांसह निर्माण होणाऱ्या अडचणी दूर करा, या आशयाचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते व माजी गर्लगुंजी ग्राम पंचायत सदस्य प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली हेस्कॉमचे तालुका अधिकारी प्रवीण बरगाळे यांना नागरिकांनी निवेदन सादर केले. गर्लगुंजीत होणाऱ्या माऊली देवीच्या यात्रेच्याकाळात सुरळीत विद्युत पुरवठा करा तसेच तालुक्यातील प्रत्येक भागात लाईनमनची नेमणूक करा अशीही मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी विजय लोहार, परशराम बेळगांवकर, सतीश बुरुड, रामचंद्र लोहार आदी उपस्थित होते.
जावेद यांची गर्लगुंजी भागासाठी नेमणूक करा..
सेक्शन अधिकारी जावेद यांची गर्लगुंजी भागासाठी नेमणूक करा, त्यामुळे येथील समस्या दूर होण्यास मदत होईल असेही सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे..






Leave a Reply