July 21, 2026

समाजाच्या ‘अभियंत्याचा’ सन्मान

0

पेशाने अभियंता व गर्लगुंजी  ग्राम पंचायत सामाजिक विकासपुरुष सदस्य प्रसाद पाटील यांचा केएलईतर्फे डॉक्टरदिनी विशेष…


IMG-20260704-WA0064

पेशाने अभियंता व गर्लगुंजी  ग्राम पंचायत सामाजिक विकासपुरुष सदस्य प्रसाद पाटील यांचा केएलईतर्फे डॉक्टरदिनी विशेष सत्कार…

खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

     तालुक्यातील सर्व घटकांना एकत्र घेऊन दिनदुबळ्यांच्या समस्यांसाठी कायमच झटत असतांना स्वतःही 33 वेळा  रक्त दान करुन शेकडो नागरिकांचे प्राण वाचवण्याचे पुण्य ज्यांनी केले ते म्हणजेच गर्लगुंजीग्राम पंचायतीचे सदस्य तथा पेशाने अभियंता असलेल्या प्रसाद पाटील यांचा समाजाचा अभियंता म्हणून केएलईसारख्या जागतिक आरोग्य संस्थेच्यावतीने सन्मान करण्यात आला. निमित्त होते डॉक्टर दिनाचे!

असे आहे प्रसाद पाटील यांचे सामाजिक कार्य…

    आठवड्यामध्ये कमीतकमी 4, ते 5 पेशंट्स ना वेळेत उपचारासाठी ऍडमिट करून 1500 पेक्षा जास्त खानापूर तालुका आणि इतर ठिकाणच्या नागरिकांचे प्राण वाचविण्याचे काम आणि वेगवेगळ्या सरकारी योजनांमध्ये शस्त्रक्रिया करून देण्याचे काम त्याचबरोबर स्वतः 33 वेळा रक्तदान आणि कित्येक जणांना इतर माध्यमातून रक्त पुरविण्याचे काम गर्लगुंजी ग्राम पंचायत चे सदस्य प्रसाद विठ्ठल पाटील यांनी केले आहे.त्यांनी स्वतः  इंजिनीयर आहेत पण डॉक्टर दिना दिवशी त्यांचा सन्मान KlE सारख्या नामांकित संस्थेकडून झाला संस्थेचे संचालक डॉ.राजशेखर, चीफ ऑपरेटिंग ऑफिसर नवीन एम,जिल्हा मुख्य कुटुंब नियोजनाधिकारी डॉ.विश्वनाथ भोवी,मेडिकल सुपरिटेंडेट संजय कंबार,संस्थेचे  विद्यार्थी,डॉक्टर आणि इतर स्टाफ सर्व पब्लिक रिलेशन ऑफिसर उपस्थित होते
यावेळी डॉ.श्रीकांत मैत्री, डॉ.अजय काळे,डॉ. खोत डॉ.जमादार, डॉ. पोटे, डॉ .केदार ,  समाजसेवक नागेश नार्वेकर यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलतांना डॉ.राजशेखर यांनी  स्वतःची काळजी घेतली पाहिजेत, तर डॉक्टरांनी योग्य उपचार दिली पाहिजेत, असे सांगतानाच आज कालचे रुग्ण  गुगल चॅट जीपिटीद्वारे अर्धवट अभ्यास करून येतात, त्यांना प्रत्यक्षात सत्यस्थिती काय आहे हे समजत नाही, त्यांना समजावून सांगणे गरजेचे असल्याचेचेही ते म्हणाले.

    प्रत्येक दवाखान्यात निरोलॉजी व कार्डियाक उपचार सुरू करा; प्रसाद पाटील…

यावेळी बोलतांना प्रसाद पाटील यांनी, खानापूर तालुक्यातील गरीब रुग्णांना होईल तितकी मदत करावी, त्यांना कोणत्याही शासकीय योजनांमध्ये विशेष सवलत देवून, उपचार करावे, योजनेमध्ये शक्य नसल्यास गोरगरीब रुग्णांना मोठी कसरत करावी लागते. सध्याचे युगात निरोलॉजी आणि कार्डियाक आजारावर प्रत्येक दवाखान्यात उपचार सुरू करावेत, अशी मागणी करतानाच, आपण 6 गावे दत्तक घेऊन सुरू केलेली विचारसेवा मोलाची असून, त्याबद्दल तुमचे आभार असेही श्री. पाटील पुढे बोलतांना म्हणाले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *