October 18, 2026

खानापूरवासियांनो काळजी नसावी!
खानापूर मासळी मार्केट रस्त्याबाबत दीड महिन्यात तोडगा काढणार; आमदार विठ्ठल हलगेकर

0

जिल्हाधिकारी, राष्ट्रीय रस्ते मंडळ अधिकारी , प्रांताधिकारी, खानापूर तहसीलदार,सर्वे कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या उपस्थित पार पडली बैठक!…


IMG_20260908_215640



जिल्हाधिकारी, राष्ट्रीय रस्ते मंडळ अधिकारी , प्रांताधिकारी, खानापूर तहसीलदार,सर्वे कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या उपस्थित पार पडली बैठक!

खानापूर लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
   कोर्ट स्टे मध्ये अडकून पडलेल्या खानापूर हेस्कॉम कार्यालय ते मासळी मार्केट मलप्रभा नदीपर्यंतच्या रस्त्याचे काम अखेर दीड महिन्यात मार्गी लागणार आहे, जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा रस्ते मंडळ, प्रांताधिकारी, तहसीलदार, सर्वे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संबंधित शेतकऱ्यांसोबत शुक्रवारी (दि.4) जिल्हाधिकारी कार्यालयात या संदर्भात बैठक पार पडली असून, त्यामध्ये तक्रारदार शेतकऱ्यांची समजूत काढण्यात आली आहे, त्यामुळे येत्या दीड महिन्यात या समस्येवर तोडगा काढण्यात येईल अशी माहिती आमदार विठ्ठल हलगेकर यांनी लोकहित न्यूज शी बोलतांना दिली.

यासंदर्भात अनेकवेळा चारवेळा बैठक..
याआधी रस्त्यासंदर्भात अधिकाऱ्यांसोबत चार वेळा बैठक पार पडली, त्यामध्ये समाधानकारक चर्चा झाली नव्हती. परंतु शुक्रवारी झालेल्या बैठकीत सकारात्मक दृष्टीने चर्चा करण्यात आली. यावेळी संबंधित शेतकऱ्यांचे म्हणणे जिल्हाधिकाऱ्यांनी ऐकून घेतले. या चर्चेनंतर दीड महिन्याच्या कालावधीत कोणत्याही परिस्थितीत या ही समस्या निकालात काढण्यात येईल, असेही यावेळी झालेल्या चर्चेवरून सूचित करण्यात आले.

कालच काँग्रेस नेत्यांनी दिला होता रस्ता रोकोचा इशारा…
  तालुका ग्राम पंचायत सदस्य संघटनेचे उपाध्यक्ष विनायक मुतगेकर, तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष अँड ईश्वर घाडी, यशवंत बिर्जे यांनी रस्त्याची पाहणी करून गणेश उत्सवाच्या आधी बांधकाम खात्याने या रस्त्यावर पडलेले खड्डे न भरल्यास रस्ता रोकोचा इशारा निवेदनाद्वारे दिला होता. त्यानंतर तालुका अधिकाऱ्यांना जाग आल्याचे चर्चा तालुक्यात असल्याचा प्रश्न आमदारांना विचारला असता, समस्येवर आवाज उठवणे योग्यच आहे, पण, त्याआधी आम्हीं या समस्येवर तोडगा काढण्यासाठी चारवेळा बैठका घेतल्या आहेत असेही आमदार म्हणाले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *