माजी मुख्यमंत्री बी. एस. येड्डीयुरप्पा यांची राजकीय पन्नाशी; चित्रदुर्ग येथील कार्यक्रमात हजर रहा; आ. हलगेकर यांचे आवाहन!


पहिल्यांदाच दक्षिण भारतात भाजप सत्ता खेचून आणणारे मुख्यमंत्री!

      

खानापूर/ चित्रदुर्ग: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

        पहिल्यांदाच दक्षिण भारतात भाजपची सत्ता स्थापन करणारे तसेच यशस्वी मुख्यमंत्र्यांपैकी एक म्हणून ओळखले जाणारे भाजपचे माजी राष्ट्रीय भाजप उपाध्यक्ष, दिग्गज नेते बी. एस.येड्डियुरप्पा यांच्या यशस्वी राजकारणाला पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत, त्यानिमित्त शनिवारी ( 9 मे) चित्रदुर्ग येथे अभिचिंतन (अभिनंदनाचा ) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. व्हिडिओच्या माध्यमातून या सभेचा पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थकांनी लाभ घ्यावा असेही आ. हलगेकर यांनी यांनी सोसियल मीडियाच्या माध्यमातून केले आहे.

येड्डियुरप्पा यांचे राज्याच्या विकासात योगदान: आमदार हलगेकर…

      ज्याकाळी दक्षिण भारतात भाजपला सत्ता काबीज करणे अशक्य होते, आशाकाळी तत्कालीन मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्याबरोबर युती करून भाजपतर्फे उपमुख्यमंत्रीपद मिळवून विविध विकासकांच्या लोकप्रियतेमुळे लगेच कर्नाटकात पहिल्यांदाच भाजपची सत्ता आणून दक्षिण भारतात पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान माजी मुख्यमंत्री बी. एस. येड्डियुरप्पा यांनाच दिला जातो. त्यानंतर त्यांनी राज्यात अनेक लोकप्रिय योजना आणून गोरगरीब, दिव्यांग , सामान्य नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. त्यामुळेच त्यानंतर दोनवेळा भाजपची राज्यात सत्ता आली. शिवाय त्यानंतरच खऱ्या अर्थाने दक्षिण भारतात भाजपची सत्ता अद्याप टिकून आहे. त्याचे खरे शिलेदार बी. एस येड्डियुरपा आहेत अशी माहिती आमदार विठ्ठल हलगेकर यांनी लोकहित न्यूज शी बोलतांना दिली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *