खानापूर मराठा मंडळ पदवीधर महाविद्यालयात बीए,बिकॉम विद्यार्थांचे स्वागत; विविध संघटनांचे उद्घघाटन!
Oplus_16908288
गुरुपौर्णिमेनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन; राज्य ज्युडो प्रशिक्षक कु. रोहिणी यांनी मार्गदर्शन केले…

खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
खानापूर येथील मराठा मंडळ कला आणि वाणिज्य महाविद्यालयात गुरुपौर्णिमेनिमित्त जिमखाना आणि इतर संघटनांचे उद्घघाटन आणि बीए व बीकॉम प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी स्वागत कार्यक्रम नुकताच पार पडला. मराठा मंडळ संस्थेचे संचालक परशुरामआण्णा गुरव आणि शिवाजीराव पाटील यांच्या या कार्यक्रमांचे उद्घघाटन झाले तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉलेजचे प्राचार्य प्रा. जे. बी अंची होते. जिमखान्याचे उपाध्यक्ष डॉ. आर. एस. तिरवीर यांनी स्वागत केले.
विद्यार्थांच्या स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरवात झाली. यावेळी पीई शिक्षक कपिल गुरव, सरचिटणीस कु. सानिका होसुरकर, उपसरचिटणीस ओम पवार, महिला प्रतिनिधी कु. अर्चना देसाई, क्रीडा सचिव कु. श्रेयस हल्ल्याळकर, कु. आर्शिया सनदी, सांस्कृतिक प्रतिनिधी प्रणाली ठाकर, कु. पूनम देसाई असोसिएशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
कर्नाटक राज्य ज्युडो प्रशिक्षक कु. रोहिणी पाटील यांचे विशेष मार्गदर्शन…
यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहिलेल्या कर्नाटक राज्य ज्युडो प्रशिक्षक कु. रोहिणी पाटील यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण आणि खेळाबद्दल विशेष मार्गदर्शन केले. त्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक नवनवीन गोष्टींची माहिती मिळाली.
प्रा. वाणिज्य विभागाच्या प्रमुख प्रणाली सावंत यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. डॉ. सुनंदा कुरनी यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, वर्ग प्रतिनिधी आणि विद्यार्थी सहभागी झाले होते.