आदर्श ग्राम पंचायत गोल्याळी अध्यक्ष म्हणून गोवा येथे गौरव; जिल्ह्यातून शुभेच्छांचा वर्षाव…
जांबोटी: लोकहित न्यूज..
उत्तम पंचायतीचे कारभारी अर्थात ‘ सरपंच ‘अध्यक्ष म्हणून गोल्याळी गावचे युवा नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे नामदेव गुरव यांचा गोवा येथे राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान करण्यात आला. पंचायत क्षेत्रात उत्तम प्रशासन राखत विकास कामे, सामाजिक सलोखा, नागरीकांच्या समस्यांचा वेळोवेळी निपटारा करण्यात ते ‘उत्तम’ ठरले आहेत. त्याची दखल घेत गोवा येथील शासकिय बांधकाम खाते व विविध सरकारी संस्थांच्यावतीने श्री. गुरव यांची निवड करत प्रतिष्ठेचा राष्ट्रीय पुरस्कार त्यांना प्रदान केले आहे. त्याबद्दल नामदेव गुरव यांच्यावर जिल्ह्यातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे… ‘लोकहित न्यूज’ तर्फे गुरव यांना खूप खूप शुभेच्छा…..
..इतर पंचायत अध्यक्षांनीही आदर्श घेण्याची गरज…
नामदेव गुरव यांनी आपल्या काळात ग्राम पंचायत इमारत, काँक्रिट रस्ते, घरकुल योजनांसह नागरीकांच्या वेळोवेळी समस्या सोडवण्यास प्रयत्न केले आहेत. याप्रमाणे जांबोटी भागांतील इतर पंचायत अध्यक्षांनीही यांचा आदर्श घेण्याची गरज आहे.. तरच गावे सुजलाम सुफलाम होतील अशा प्रतिक्रीया उमटत आहेत..








Leave a Reply