..महिना दहा हजार रुपये मानधनसह, विविध समस्या सोडवण्याकडे सरकारचे दुर्लक्ष…
बेळगांव : लोकहित न्यूज
ग्रामीण भागात बाळंतीन यांच्या आरोग्याची काळजी घेणे, त्यांना दवाखान्यापर्यंत नेवून पोहचवणे अशी आरोग्य दूत म्हणून सेवा बजावणाऱ्या आशा कार्यकर्त्यांचे विविध मागण्यासाठी राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे. चार महिन्यापूर्वी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासोबत बंगळूरमध्ये आशा कार्यकर्त्यांची बैठक झाली होती. त्यावेळी त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण करू अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली होती. मात्र, अद्याप त्यापैकी एकही मागणी पूर्ण होवू शकली नाही. अनेक निवेदने, आंदोलने करूनही सरकारने डोळेझाकपणा केला आहे. त्यामुळे मंगळवारपासून पुन्हा आशा कार्यकर्त्यांनी मागण्या मान्य होईपर्यंत राज्यव्यापी आंदोलन छेडले आहे. राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू आहे.
..अशा आहेत ‘ आशांच्या मागग्ण्या…
महिना दहा हजार रुपये मानधन, अंगणवाडी सेविकांप्रमाणे प्रोत्साहन धन देणे, जाचक अटी रद्द करणे, केंद्र सरकारकडून मिळणारे प्रोत्साहन धन लागू करणे अशा मागण्या आहेत. त्या तात्काळ पूर्ण करण्याची मागणी आहे. बेळगावात 3800 आशा कार्यकर्त्यां आहेत.







Leave a Reply