खानापूरात माजी सैनिक संघटनेच्या वतीने प्रजासत्ताक दिन..
खानापूर: लोकहित न्यूज
स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदान आणि स्वातंत्र्यवीरांच्या आहुतीमुळे आज आपल्या सर्वांचा मुक्त संचार सुरू आहे, त्यामुळे आम्ही सैनिकांचे कार्य विसरून चालणार नाही, त्यांच्याच बलिदानाचे प्रतीक म्हणून आपण आजचा दिवस साजरा करत आहोत याचा सर्वांनाच अभिमान हवा, असे मत खानापूर विकास आघाडीचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते भरमाणी पाटील यांनी मांडले. खानापूर माजी स्वातंत्र्य सैनिक संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या 79 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग मेलगे होते. राष्ट्रगीत आणि सैनिकांच्या सालामीने कार्यक्रमाची सूरवात झाली. यावेळी शिवाजी चौगुळे, नारायण झुंजवाडकर, प्रकाश गोवेकर, शिवानंद पाटील आदी उपस्थित होते.






Leave a Reply