खानापूर तहसील’ची लोकायुक्त पोलिसांकडून झाडा झडती..


कामकाज धीम्या गती वाढवण्याबरोबर भ्रष्टाचार रोखण्यासाठी तपासणी केल्याची लोकायुक्त डीएसपी पाटील यांची माहिती..

खानापूर : लोकहित

गेल्या दोन वर्षापासून चर्चेत राहिलेल्या खानापूर तहसीलदार कार्यालयाची चार महिन्यांत दुसऱ्यांदा अचानक लोकायुक्त पोलीसांनी धाड कागदपत्रांची तपासणी केली. तहसील’चे कामकाज तत्काळ झाले पाहिजे, लोकांची कामे वेळेत झाली पाहिजेत, शिवाय भ्रष्टाचाराला थारा मिळू नये, या उद्देशाने लोकायुक्त पोलीसांकडून सोमवारी झाडा -झडती घेण्यात आली. बेहिशेबी मालमत्ता सापडल्याच्या आरोपावरून तहसीलदार प्रकाश गायकवाड यांची दोन महिन्यापूर्वी खानापुरातून उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यानंतर तीन महिन्यांत दुसऱ्यांदा अचानक लोकायुक्त धाड पडली आहे, कागदपत्रांची तपासणी करत कारभाराची चौकशी केल्याची माहिती लोकायुक्त डीएसपी बी. एस. पाटील यांनी लोकहित न्यूज’ शी बोलताना दिली. यावेळी सीपीआय रविकुमार धारमट्टी, खानापुर च्या अधिकारी अन्नपूर्णेश्र्वरी व त्यांचें सहकारी उपस्थित होते..

…तरीही तहसील कार्यालयाची चर्चा..अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले..

मागचे तहसीलदार प्रकाश गायकवाड यांच्यावर धाड पडल्यानंतर काहीं काळ अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले होते. माञ, तरीही नागरिकांची पिळवणूक सुरूच होती. सर्वे, सब-रजिस्टरसह तहसील कार्यालयात नागरिकांची हेळसांड सुरूच होती. त्याचे वृत्त लोकायुक्त पोलिसानंपर्यंत गेल्यानंतर ही धाड टाकावी लागली, अशी माहिती सूत्रांनी दिली.. या धाडीमुळे अधिकाऱ्यांचे धाबे दणाणलेअसून, यापुढे तरी कारभार सुधारणार का? असा प्रश्न उपस्थित होतो आहे..

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *