July 21, 2026

पश्चिम बंगाल सरकार बरखास्त करा ..

0
IMG-20250421-WA0047.jpg

पश्चिम बंगालमधील हिंदुवरील अत्याचार थांबवण्यास सरकार अपयशी; तालुका हिंदुत्ववादी संघटनांची तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी..

खानापूर: लोकहित न्यूज

    पश्चिम बंगाल राज्यातील मुर्शीदाबाद जिह्यात हिंदुंवर अत्याचार सुरू असून, तेथील 300 हिंदूंची घरे जाळण्यात आली असताना येथील सरकार कोणतीच कारवाई करत नाही. तसेच येथील हिंदु मंदिरेही पेटवून देण्याच्या घटना घडत असून, हिंदू महिलांवर अत्याचार केले जात आहेत. ते रोखण्यास ममता बॅनर्जी सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळें हे सरकार बरखास्त करुन तेथे राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी तालुक्यांतील विविध हिंदू संघटनांनी तहसिलदारांकडे निवेदनाव्दारे केली. प्रथमतः शहरातून मोर्चा काढून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी तालुका भाजप अध्यक्ष बसवराज सानीकोप, माजी अध्यक्ष संजय कुबल, युवा भाजप नेते पंडित ओगले, तालुका भाजप सचिव मल्लापा मारीहाळ, गुंडू तोपिनकट्टी , भाजप नेते लक्ष्मण झांजरे, ॲड. चेतन मनेरीकर, अशोक देसाई, अनंत सावंत, जी. जी . पाटील, राहुल अळवणी, सिद्धार्थ कपिलेश्वरी, धनाजी देवलतकर , पंकज कुट्रे, संजय मयेकर, ॲड. राजश्री हिरेमठ आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *