चोरल्याजवळ अपघातात कणकुंबीचा युवक ठार..


गोव्यात एचडीएफसी बँकेत कामाला असणाऱ्या विक्रम कोळेकर याचा दुर्देवी अंत; मनमिळावू युवकाच्या जाण्याची भागात हळहळ

कणकुंबी: लोकहित न्यूज 

   शिवजयंती उत्सवासाठी गावाकडे आलेल्या विक्रम कोळेकर ( वय.28) रा. कणकुंबी (ता.खानापूर ) युवक चोरल्याजवळ अपघातात ठार झाला आहे. शनीवारी सकाळीं सातच्या सुमारास ही घटना घडली. मनमिळावू युवकाच्या जाण्याची हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

स्थानीक माहितीनुसार विक्रम कोळेकर हा गोव्यामध्ये एचडीएफसी बँकेमध्ये कामाला होता, गावातील शिवजयंती उत्सवासाठी तो दोन दिवसाच्या सुट्टीवर आला होता. सर्व कार्यक्रम आटोपून तो पुन्हा गोव्याला दुचाकीवरून चालला होता, चोर्ला गावाजवळ येताच समोरून येणाऱ्या रीक्षाची दुचाकीला  जोरदार धडक बसली . त्यात तो जागीच ठार झाला. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह खानापूर शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आला. या घटनेची नोंद खानापूर पोलिसात झाली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Prev :