जांबोटी माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनो शाब्बास! तुमच्या उतुंग यशाबद्दल खूप खूप अभिनंदन!

0
IMG-20250503-WA0044.jpg

मुख्याध्यापक महेश सडेकर ; यंदाची परीक्षा होती खूप कठीण..

जांबोटी: लोकहित न्यूज ( विशेष संपादकीय)

दहावी बोर्डची परीक्षा म्हणजे जणू प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील पहिलीच पायरी म्हणावी लागेल. येथून पुढे ठरते की, आयुष्य कोणत्या वळणावर जाणार आहे. पूर्वीपासूनच मॅट्रिक पासला महत्व आहे. यंदाची बोर्ड परीक्षा खूपच कठीण होती. सीसीटिव्ही कॅमेऱ्यासह भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली होती. त्यामुळें कॉपीचे प्रकार अजिबात चालले नाहीत. प्रत्येक हायस्कूलच्या मुख्याध्यापकांना डोळ्यात तेल घालून परीक्षा पाडावी लागली. अशा परिस्थितीत जांबोटी माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मोठें परिश्रम घेत यश संपादन केले आहे. त्याबद्दल या विद्यालयाचे मुख्याध्यापक महेश सडेकर यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले आहे… लोकहित न्यूज’ तर्फे यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन!


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed