जांबोटी विभाग क्रिकेट लीगकडून हब्बनहट्टी श्री स्वयंभू मारुती तीर्थक्षेत्रावर स्वच्छता अभियान…


हब्बनहट्टी: लोकहित न्यूज नेटवर्क

जांबोटी विभाग क्रिकेट लीगकडून स्वयंभू मारुती हब्बनहट्टी तीर्थक्षेत्रावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

आमदार श्री विठ्ठल सो. हलगेकर सर व युवकांचे मार्गदर्शक भाजपा नेते सदानंद पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार शनीवारी हनुमान तीर्थक्षेत्रावरील परीसरात साचलेल्या कचऱ्याची उचल करण्यात आली. नुकतेच या ठिकाणीं महाशिवरात्री उत्सवानिमित्त भाविकांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात याठिकाणी कचरा साचला होता. त्याची दखल घेत जांबोटी विभाग क्रिकेट लिगकडून दखल घेण्यात आली. या उपक्रमाबद्दल भागातून क्रिकेट लीगच्या कार्यकर्त्यांचे कौतुक होत आहे.. यावेळी या लीगचे अध्यक्ष महेश गुरव, निवृत्त सैनिक रमेश कांबळे, युवा नेते दौलत कोलिकर, राजू चिखलकर, युवा नेते अनंत सावंत, अरुण बिर्जे, अशोक बिर्जे, व्यंकट पाटील, विलास गायकवाड, सोमाजी गवसेकर, सचिन साबळे,महेश गावकर, अशोक गावकर, समीर निवगिरे, सुनील नाईक,राजू तलवार, सुनील पाटील, कृष्णा पाटील, नागेश गावडे,बाबूराव पाटील ,वासुदेव सावंत उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *