दिल्लीत 15 वर्षांहून अधिक जुन्या वाहनांना मार्चनंतर पेट्रोल बंद…
दिल्लीत 15 वर्षांहून अधिक जुन्या वाहनांना मार्चनंतर पेट्रोल बंद…
कर्नाटक- महाराष्ट्रसह इतर राज्यांमध्येही हा कायदा प्रभावी होण्याची शक्यता…
दिल्ली: लोकहित न्यूज नेटवर्क
पंधरा वर्षांपासून अधिक काळ रस्त्यावर चालत असलेल्या जुन्या वाहनांवर आता गडांतर येणार आहे, 31 मार्चनंतर दिल्लीमध्ये अशा वाहनांना पेट्रोल पुरवठा बंद केला जाणार आहे. अशा वाहनांमुळे वाढते प्रदूषण रोखण्यासाठी नुकताच सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने हा निर्णय घेतल्याचे राज्याचे पर्यावरण व संरक्षण मंत्री मनजिंदर सिंग सिरसा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. यात विशेष म्हणजे कर्नाटक -महाराष्ट्रसह देशांतील बहूतेक राज्यात जुन्या वाहनांची संख्या मोठी असल्याने दिल्लीप्रमाणे याही ठिकाणीं पेट्रोल -डिझेल बंदीचा कायदा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. सद्या कर्नाटकात पंधरा वर्षाहून अधिक काळ चलनात असलेल्या वाहनांचे आरटीओ पाशिंग बंद आहे.
दिल्ली पर्यावरणमंत्री सिरसा यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रदूषणाबाबत समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. निवडणूकीआधी दिलेल्या आश्वासन पूर्तेतकडे दिल्ली भाजप सरकारची वाटचाल सुरू आहे. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली सर्वच खात्याचे मंत्री सक्रिय झाले असून, नागरी विकासासासह नदी, नाले, परीसर प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येणार आहेत.
….जूने वाहन ओळखणारी साधने पंपावर बसविणार…
सरकारने जुन्या वाहनांना पेट्रोल बंदी घातली असली तरी, पंधरा वर्षांपासून अधिक जूने वाहन कशे कळणार? असा प्रश्न आहे. त्यावर सरकारने उपाय काढला असून, पेट्रोल पंपावर तसे वाहन ओळखणारे साधन ( मशीन) बसविण्यात येणार आहे. सदर मशीनमध्ये वाहन चेक करूनच पेट्रोल दिले जाईल.

Like
Comment
Send
Share
