घरे देतो असे सांगून 15 ते 20 हजार रुपये सदस्यांनी उकळल्याचा आरोप…
घोटगाळी: लोकहित न्यूज
अलीकडच्या काळात चर्चेत राहिलेल्या घोटगाळी ग्राम पंचायतीचे अनेक प्रकरण समोर आले असून, केंद्र सरकारकडून मोफत मिळणाऱ्या घरांसाठी चक्क सदस्यांनीच नागरिकांकडून पैसे घेतल्याची तक्रार घोटगाळी,कोडगाई, शिवठाण येथील नागरिकांनी आमदार विठ्ठल हकगेकर यांच्याकडे केली आहे. याची दखल घेऊन तपास करण्याची सूचना अधिकाऱ्याना देण्याची हमी आ. हलगेकर यांनी नागरिकांना दिली .
…. नेमकं काय आहे हे प्रकरण ; काय म्हणतात तक्रारदार..
केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरे आली असून, ती मोफत दिली जातात असे अधिकाऱ्यांनी आधीच स्पष्ट केले आहे. त्यासाठी मागच्या काळात 1 लाख 20 हजार रूपये मिळाले आहेत, यावेळी त्यात वाढ होणार होती पण अद्याप तरी होवू शकली नाही. असे असताना घोटगाळी ग्राम पंचायतीच्या काहीं सदस्यांनी बेंगळूरला पैशे द्यायला पाहिजे, तेथून काम करून आणायला पाहिजे म्हणून काहीं लोकांकडून 15 तर काहींकडून 20 हजार घेतल्याचा नागरिकांचा आरोप आहे , याबाबत पीडीओना विचारले असता, ही घरे फ्री दिली जातात असे त्यांनी कोदगईचे सामाजिक कार्यकर्ते परशुराम कोलेकर यांना दिली. परिस्थितीने गरीब असणाऱ्या नागरीकांकडून पैशे घेणे कितपत योग्य आहे असा प्रश्न उपस्थित करत घेतलेले पैशे परत करावेत असेही कोलेककर पुढे बोलतांना स्पष्ट केले. फ्री घरे मिळत आहेत याची माहिती मिळताच पैशे का घेतला? असे विचारत नागरिकांनी पंचायतीवर मोर्चा काढला. यावेळी कोणीच प्रतिसाद न देता उलट पैशे दिलेल्या नागरिकांवर दमदाटी करण्याचा प्रयत्न झाल्याने आमदार विठ्ठल हलगेकर यांच्याकडे धाव घेऊन याबाबत कैफियत मांडली. पंचायतीमध्ये इतरही कामामध्ये गैरव्यवहार झाला आहे याची चौकशी व्हावी अशीही मागणी आम्हीं केल्याचे चंद्रकांत देसाई यांनी लोकहित शी बोलताना सांगितले.

तालुका पंचायत व ग्राम पंचायतीला निवेदन…
याबाबत गुरुवारी परशुराम कोलेकर व नागरिकांनी खानापूर तालुका पंचायत अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. त्याच्या दोन प्रती घोटगाळी पंचायत पीडीओ , जिल्हा पंचायत सीईओंना पाठवण्यात आले. सदर निवेदनात घोटगाळी पंचायत सदस्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे मंजूर करून देतो असे सांगत तब्बळ 10 लोकांकडून 15 हजार , 20 हजार उकळल्याचा आरोप केला असून, याची तालुका पंचायत, जिल्हा पांचातीने चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे. यापूर्वी ग्राम पंचायतीलाही या समस्येचे निवेदन दिले आहे. आमदार भेटीदरम्यान व तालुका पंचायतीला निवेदन देताना परशुराम ना. कोलेकर, खेमराज गडकरी नारायण पवार, पांडूरंग कुंभार, पांडूरंग मोरे, चंद्रकांत देसाई, सटवाप्पा कुंभार आदी उपस्थित होते.
प्रतिक्रिया –
घोटगाळी पंचायती क्षेत्रातील नागरीक आले होते, त्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेच्या नावाखाली काहीं ग्राम पंचायत सदस्यांनी 10 नागरिकांपैकी कोणाकडून 15 हजार तर कोणाकडून 20 हजार घेतले असल्याची माहिती मला दिली. मोफत मिळणाऱ्या घरांसाठीही पैशे उकळले जात असतील तर ते चुकीचे आहे. याबाबत चौकशी करण्यात येईल .
– विठ्ठल हलगेकर, आमदार…
Leave a Reply