July 21, 2026

….आनंदवार्ता!                                    यंदा मोसमी (मान्सून) पाऊस दर वर्षीच्या वेळेआधी केरळमध्ये होणार दखल….

0
Screenshot_2025_0516_072658.jpg

27 मे ला केरळमध्ये मान्सून पाऊस दाखल होणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज: सद्या देशाच्या बहुतेक भागांत सूरू असलेल्या वळीव पावसामुळे मान्सून साठी पोषक वातावरण..

पुणे: लोकहित न्यूज (वृत्तसंस्था)

      आधीच यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडणार असल्याचे जाहीर करण्यात आले असताना, आणखी एक आनंदवार्ता!हवामान खात्याने दिली आहे. 31 मे पर्यंत मोसमी वाऱ्याची गती वाढणार असून,  दरवर्षीच्या वेळेआधी यंदा मोसमी अर्थात मान्सून पाऊस केरळमध्ये दाखल होईल, त्यानंतर हळू हळू देशाच्या इतर भागांत पाऊस पसरेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. 27 मे ला केरळमध्ये मान्सून पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे.

    दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात मोसमी वारे वाहू लागतात आणि पावसाला सुरूवात होते. यंदा दरवर्षीच्या वेळेआधी म्हणजे 31 मेपर्यंत मोसमी वारे वाहणार असल्याने हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा जूनच्या पहिल्या आठवडयात दक्षिण भारत, महाराष्ट्र, ओडिसा तसेच ईशान्य भारतातील भागांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे. दुसऱ्या आठवडयात सिंधुदुर्ग, गोवा सावंतवाडी या पश्चिम किनारपट्टी भागात पाऊस पडेल तर तिसऱ्या आठवड्यात कर्नाटकसह ईशान्य भारतात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल तर वायव्य भारत व तामिळनाडू भाग वगळता भारताच्या इतर भागांत पाऊस पडणार आहे. तर चौथ्या आठवडयात पूर्व भारत, मध्य भारत , पूर्व राजस्थान, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश , महाराष्ट्र, कर्नाटक , केरळ च्या किनारपट्टी प्रदेशात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडणार आहे. 31 मे पर्यंत मोसमी वारे वाहणार असून त्याआधी 27 मेला केरळमध्ये मान्सून पाऊस पडेल असाही अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे. सद्या देशाच्या बहुतेक भागांत सूरू असलेल्या वळीव पावसामुळे गरम वातावरणात गारवा निर्माण झाला असून, मान्सून पावसासाठी पोषक वातावरण दिसत आहे. परिणामी सद्यस्थितीत काहीं भागांत उन्हाचे चटके वाढल्याने पाणी टंचाईची तीव्रता वाढली असून, नदी नाले कोरडेठाक पडल्याची स्थीती आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *