घोटगाळी प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेत कोणताही गैरव्यवहार झालेला नाही..


घोटगाळी ग्रा.पं. उपाध्यक्ष पुनीत पाटील यांचे प्रत्युत्तर;  विरोधकांचे आमच्या बदनामीचे षडयंत्र असल्याचा आरोप…

घोटगाळी : लोकहित न्यूज

      दोन दिवसांपूर्वी ‘ लोकहित न्यूज ‘ मधून घोटगाळी ग्राम पंचायत सदस्यांनी प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेंच्या नावाखाली 15 ते 20 हजार दहा रुपये लोकांकडून घेतल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. ती पूर्णपणे निराधार अर्थात राजकीय विरोधकांचे आपच्या विरुद्ध बदनामीचे षडयंत्र आहे, त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये असे प्रत्युत्तर घोटगाळी ग्राम पंचायत उपाध्यक्ष पूनित पाटील याणी लोकहित न्यूज शी बोलताना दिले आहे. विरोधकांनी केलेला आरोप सिद्ध करुन दाखवावा, आम्हीं कोणाकडूनही पैशे घेतलेले नाहीत असेही ते पुढे बोलतांना म्हणाले. 

   आम्हीं जनतेच्या हितासाठी अहोरात्र कार्यरत आहोत, जंता आमच्याच बाजूने आहे, कोणीही कितीही आमच्या विरुद्ध जनतेला भडकवण्याचा प्रयत्न करत असले तरी त्याला कोणी बळी पडू नये, असेही पाटील यांनी सांगितले. आम्हीं सर्व सदस्य कोणत्याही चौकशीला सामोरे जायला तयार असे त्यांनी स्पष्ट केले.

       

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *