,

होय, मी डीसीसी बँकेची निवडणूक लढविणारच;  माजी आमदार. डॉ. अंजली निंबाळकर…


रवीवारी पार पडलेल्या कार्यकर्त्यांचा बैठकीत घोषणा.. मे-मध्ये झेडपी,टीपी निवडणूक, तयारीला लागा, काही कार्यकर्त्यांची झाडा झाडी..

खानापूर : लोकहित न्यूज

   तालुक्यांतील शेतकऱ्यांची पिळवणूक लक्षात घेता, त्यांना कोणीच वाली उरला नसल्याची खंत व्यक्त करत, होय मी तालुका डीसीसी बँकेची निवडणूक लढविणार असल्याची घोषणा मा. आ. तथा एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी केली. रविवारी त्यांच्या रायगड या निवास्थानी पार पडलेल्या तालुका ब्लॉक काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्या बोलत होत्या. तसेच मे दरम्यान झेडपी, टीपी निवडणुका होणार असल्याचे संकेत देत सर्वांनी एकजुटीने आतापासूनच तयारीला लागा असेही आवाहन डॉ. निंबाळकर यांनी यावेळी केले.

….काहीं कार्यकर्त्यांची डॉ .निंबाळकर यांच्याकडून झाडा झाडी…?

   तालुक्यांतील  काहीं कार्यकर्त्यांना हाताशी धरून आमच्याच पक्षातील काहीं मंडळी आम्हीं तालुक्यांतील भूमिपुत्र असल्याचा आव आणत आहेत, गेली पंचवीस वर्षापूर्वी तालुक्यांत काँग्रेसचे नावच नव्हते. तेंव्हा ही मंडळी कुठे होती? मी तालुक्यात पक्ष बळकट करण्यासाठी दहा वर्षे परिश्रम घेतल्यामुळे कित्येक वर्षानंतर खानापुरात  काँग्रेसचा आमदार झाला. तेंव्हा कुठे तरी काँग्रेस तालुक्यात फुलले आहे. आता येवून कोणीही कोणताही आव आणून डांगोरा पेटविण्याचा प्रयत्न करेल, ते कदापी खपवून घेतले जाणार नाही. मी तालुक्याबाहेर आहे, याचा अर्थ तालुक्याच्या संपर्कात नाहीं असा होत नाही. तालुक्यांत जेंव्हा जेंव्हा भ्रष्टाचाराच्या बातम्या आमच्या काणी पडतात तेव्हा लगेच आमच्या कार्यकर्त्यांनी त्याला हाणून पाडण्याचा सूचना मी करत असते. तसेच तालुक्यातील गोरं गरीब जनतेच्याही समस्या सोडवण्यास आम्हीं समर्थ आहोत, तालुक्यांत ढवळा ढवळ करण्याऱ्यांकडे तालुक्याचा कोणीही कार्यकर्त्याने त्याकडे लक्ष देवू नये, अशी कडक सूचना माजी आमदार डॉ अंजली निंबाळकर यांनी उपस्थित नेते कार्यकर्त्यांना केली. यावेळी तालुक्यातील काहीं कार्यकर्त्यांची डॉ.निंबाळकर यांच्याकडून बराच काळ झाडा झाडी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. यावेळी कार्यकर्त्यांनी तालुक्यांतील काहीं समस्या मांडल्या, त्यावर मा.आ.डॉ. निंबाळकर यांनी तत्काळ सदर समस्यां सरकारदरबारी मांडू असे आश्वासन दिले.

जातीभेद गाडून टाका; सर्वांना एकत्र घेवून काम करा..

   आजच्याच पक्षातील मंडळी जातीचे प्रमाणपत्र देत आमच्यात दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, आम्हालाही आमची जात प्रिय आहे, म्हणून आम्हीं जातीचे राजकारण कधीं केले नाहीं. छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे आम्हीही सर्व जातीच्या लोकांना एकत्र घेऊन काम केले आहे, यापुढेही करत राहणार असे माजी आमदार डॉ .अंजली निंबाळकर यांनी स्पष्ट केले . लवकरच आणखी एकदा बैठक बोलावून निवडणूक विषयावर चर्चा करू असेही त्यांनी पुढे बोलतांना सांगितले. यावेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष ॲड. ईश्वर घाडी, चमन्ना होसमनी, महादेव कोळी, सुर्यकांत कुलकर्णी, विनायक मुतगेकर, दीपक कवठणकर, तोहिब, संजय गावडे, भैरू पाटील , ग्रा. पं.  प्रदीप कवठणकर, सूरेश जाधव , महांतेश राऊत,  यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *