बैलूर ग्राम पंचायत इमारतीची पायाभरणी


वीस लाखाच्या फंडातून पूर्ण होणार काम..

बैलूर:: लोकहित न्यूज

   बैलूर (ता. खानापूर) ग्राम पंचायतीच्या नूतन इमारतीच्या इमारतीची पायाभरणीचा कार्यक्रम नुकताच पार पडला. ग्राम पंचायत अध्यक्षा अरोही सावंत व त्यांचे पती सामाजिक कार्यकर्ते अनंत सावंत यांनी पूजेचे यजमान स्वीकारले होते. यावेळी सर्व धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले होते. ग्राम पंचायत सदस्य प्रदीप कवठणकर, लक्ष्मण बन्नार, रवींद्र गुरव, कांचन बिर्जे, मनोहर कांबळे, टी.के.बिर्जे, पंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते.

खालच्या इमारतीसाठी 20 तर वरच्या मजल्यावरील मीटिंग हॉलसाठी 10 लाख राखीव…

पंचायत इमारतीसाठी 20 लाखाचा निधी शासनाकडून मंजूर झाला असून, त्यातून पहिल्या मजल्यापर्यंतच्या काम होणार आहे. त्यामध्ये कार्यालयीन संगणक खोली, पीडीओ खोली तसेच विविध कार्यालयीन दालने तयार करण्यात येणार आहेत. आणखी दहा लाख मंजूर असून, त्यामध्ये पहिल्या मजल्यावरील बैठक खोली उभारण्यात येणार आहे. मात्र,चालू सदस्यांचा कार्यकाळ संपत आला असल्याने वरच्या मजल्याचे काम यावेळी होणार की, पुढच्या काळात हे सद्याच्या कामावर अवलंबून आहे. हे जोरात झाले तर वरच्या मजल्यावरील मीटिंग हॉलचे काम चालू कमिटीच्या काळात होईल. त्याअनुषंगाने आमचा प्रयत्न असेल असे अध्यक्षा आरोही सावंत यांनी सांगितले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *