वनखात्याची धावाधाव; तोंडावरच गंभीर दुखापत झालेल्या जखमींना बेळगांव इस्पितळात दाखल..
कणकुंबी: लोकहित न्यूज
कंणकुंबी चौकीजवळील जंगलात गुरे चरायला गेलेल्या एका नागरिकांवर अस्वलाने हल्ला केल्याने त्यांना तातडीने बेळगाव इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. दशरथ वरंडेकर ( वय.60) असे गंभीर जखमी झालेल्याचे नावं आहे. सकाळच्या सुमारास कणकुंबी गावच्या पुढे असलेल्या चौकीजवळ गुरे चरायला गेले होते. जंगलात लपून बसलेल्या अस्वलाने अचानक दशरथ यांच्यावर हल्ला चढविला. तोंडावरच अस्वलाने हल्ला केल्याने मोठी दुखापत झाली आहे. याची महिती मिळताच जिल्हा वनाधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी जागेची पाहणी करत, रुग्णाची विचारपूस केली. या घटनेची नोंद कणकुंबी वनखाते कार्यालयात झाली आहे. ..






Leave a Reply