बोगस डॉक्टर आणि बोगस औषधांविषयी सरकार गंभीर; राज्यस्तरीय समितीकडून होणार चौकशी!
हुबळी: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
राज्यात विना पदवी म्हणजेच बोगस डॉक्टरांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून, नागरिकांच्या जीवाशी खेळले जात आहे. याला जिल्हा आणि तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचा आशीर्वाद लाभल्याने त्यांच्यावर नियंत्रण कोण ठेवणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. जर स्थानिक आरोग्य अधिकारी जागृत असतील तर बोगस डॉक्टरांवर कारवाई का होईना! असा सवाल उपस्थित होतो आहे. त्यात bogas औषधेही विक्री करण्याचे प्रकार वाढले आहेत. यापुढे बोगस डॉक्टर अथवा बोगस औषधे विक्रीचे प्रकार आढळल्यास त्या प्रकाराला स्थानिक जिल्हा आणि तालुका आरोग्य अधिकारीच जबादार असतील असा इशारा आरोग्य मंत्री यू.टी. खादर यांनी हुबळी येथील आरोग्य कार्यक्रमावेळी दिला.
बंगळूरमध्ये बनावट औषधांचे रॉकेट उघड..
बंगळूर शहरातील मिर्नव सर्कलमधील कृपा हेल्थ केअर मध्ये बाहेर देशातील बोगस औषधे आढळून आली. त्यामुळे तपास अधिकाऱ्यांनी छापा टाकून मालकाला अटक केली. या घटनेनंतर राज्य सरकार गंभीर बनले असून, यासाठी तपास समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यांच्यामार्फत बोगस डॉक्टर आणि औषधांचा शोध घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
