October 20, 2026

अपघात वृत्त – जटगेच्या जवानावर काळाचा घाला; माणिकवाडी जवळ अपघातात दांपत्याचा मृत्यू

0

जटगेच्या जवानावर काळाचा घाला; माणिकवाडी जवळ अपघातात दांपत्याचा मृत्यू तालुक्यात हळहळ; कालच पत्नीसह सुट्टीवर आला…


IMG_20260909_043630

तालुक्यात हळहळ; कालच पत्नीसह सुट्टीवर आला होता जवान ….

खानापूर : लोकहित न्यूज (विलास कवठणकर) –

   काळापुढे कोणाचे चालत नाही या म्हणीनुसार काल माणिकवाडीजवळ भारतीय जवानाचा अपघातात जागीच मृत्यू झाला तर त्यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या पत्नी गंभिर जखमा असल्याने जवळच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले होते, मात्र, थोड्याच वेळात पत्नीचाही मृत्यू झाला. युवराज माळीक (वय -30) , पत्नी मोहिनी युवराज माळीक राहणार जटगे (ता. खानापूर) असे मृतांचे नाव असून, या घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

असा घडला अपघात…

पती-पत्नी दोघेही दुचाकीवरून जटगे गावाकडे निघाले असता, वाटेतच दुचाकीची ट्रकला जोरदार धडक झाली आणि त्या अपघातात भारतीय जवान सेवेतून नुकतेच सुट्टीवर आलेल्या युवराज माळीक याचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्या पत्नी गंभीर जखमी असल्याने त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र,काही काळानंतर त्यांचाही मृत्यू झाला. हा अपघात इतका भयानक होता की, अपघाताची जोरदार धडक आजुबाजूच्या परिसरात ऐकू आल्याने आजूबाजूचे लोकांनी धावून येत मदतकार्य केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *