शासनाकडून तयारी सुरू; वॉर्ड रचना, महिलांना 50 टक्के आरक्षण मुद्दा केंद्रस्थानी राहणार…
बेळगांव/ बंगळूर: लोकहित न्यूज नेटवर्क
मुख्यमंत्री डी.के शिवकुमार यांच्या घोषणेनंतर प्रशासन तयारीला लागले असून, नोव्हेंबरमध्ये ग्राम पंचायत निवडणूक होणार आहे. यामध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण आणि नवीन वाढीव वॉर्ड रचना हे दोन्हीं मुद्दे केंद्रस्थानी असतील. ग्राम पंचतीबरोबर जिल्हा आणि तालुका पंचायत निवडणूकही एकाचवेळी घेण्याचा शासनाची तयारी सुरू आहे, त्यामुळे ग्राम पातळीपासून ते जिल्हा पातळीवर राजकारण चांगलेच रंगताना दिसेल.
आरक्षणावर अनेकांचे भवितव्य अवलंबून…
निवडणुकीची कुणकुण लागताच आतापासूनच अनेकांनी तयारी सुरू केली आहे, वॉर्ड सदस्य वाढवून घेणे, राजकीय वजन वापरून आपल्या मनासारखे आरक्षण आणण्याचीचीही अनेकांनी तयारी चालविल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोणकोणाची मनोकामना पूर्ण होणार अन् कोणाच्या पदरात निराशा पडणार हे येणारा काळच सांगेल. पण, एखाद्या ठिकाणी मागच्यावेळी आलेले आरक्षण यावेळी येणे सध्यच नाही असे राजकीय जाणकारातून स्पष्ट केले जात आहे. तरीही गावागावात मोर्चेबांधणी सुरू असल्याचे दिसत आहे.