संपूर्ण सीमाभाग केसरेकर कुटुंबियांच्यामागे; तालुका म. ए समितीकडून धीर…
खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
सांगली जिल्ह्यातील कुपवाडमध्ये झालेल्या हेब्बाळ (ता. खानापूर) येथील मोहन केसरेकर आणि त्यांच्या पत्नीवर क्रूर तालिबान्याकडून खुनी हल्ला झाला त्यात त्यांच्या पत्नींचा जागीच मृत्यू झाला, तर आठ दिवसानंतर मोहन केसरेकर यांचाही मिरज येथील सरकारी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यामुळे त्यांच्या पश्चात असलेली त्यांची मुलगा आणि मुलगी पोरकी झाली आहेत. क्रूर खुनातील दोषीवर कडक कारवाई करून फाशी दिली पाहिजेत, असे सांगतानाच केसरेकर कुटुंबियांना कर्नाटक आणि महाराष्ट्र सरकारने सर्वोतोपरी शासकीय मदत करावी, दोन्हीं मुलांचे भविष्य उज्वल बनवावे अशी मागणी खानापूर म. ए. समितीने केली आहे. गुरुवारी समितीच्यावतीने तहसीलदार दुंडाप्पा कोमार यांना निवेदन सादर केले.
वरील मागणी सदर दिलेल्या निवेदनात केली आहे. यावेळी दोन्हीं मुलांचे शिक्षण, तातडीने आर्थिक मदत मिळणे, तात्काळ भरपाई, मोफत कायदेशीर सहाय्य, आवश्यक कागदपत्रे मिळण्यास मदत, बेळगांव- खानापूर जिल्हा प्रशासनाकडून समन्वय, कुटुंबीयांना मार्गदर्शन, तातडीने निर्णय घेण्याची विनंती करने आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी माझे आमदार दिगंबर पाटील, गोपाळ पाटील, माजी तालुका पंचायत सदस्य पांडुरंग सावंत, आबासाहेब दळवी, प्रकाश चव्हाण, पुंडलिक पाटील, राजाराम देसाई, एन. एन घाडी डी. पी. जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.