खानापूर कोर्टाने आज दिला महत्वाचा निर्णय; सीमावासियांमध्ये चैतन्याचे वातावरण...
खानापूर:लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
सीमावासियांचा बुलंद आवाज म्हणून केंद्र सरकारपर्यंत पोहचवण्यासाठी 2006 साली खानापूर शिव स्मारकात झालेल्या विशाल सीमावासियांच्या मेळाव्याने पोटशूळ उठलेल्या कर्नाटक सरकारने त्यावेळी उपस्थित राहिलेल्या सीमावासियांसह नेत्यांवर विविध खटले दखल केले होते. त्यामध्ये प्रमुख वक्ते शिव -शंभू अभ्यासक प्रा. नितीन भानगुडे पाटील आणि शिवसेना नेते तसेच माजी मंत्री रामदास कदम यांच्यावरही गुंन्हा नोंद झाला होता, तब्बल वीस वर्षे चाललेल्या हा खटला अखेर आज ( मंगळवार दि.11 ) खानापूर न्यायालयाने निकालात काढला असून, प्रा. नितीन भानगुडे पाटील आणि शिवसेना नेते रामदास कदम यांची निर्दोष म्हणून मुक्तता केली आहे. त्यामुळे सीमावासियांत चैतन्याचे वातावरण पसरले आहे.
आज हा मत्वपूर्ण निर्णय खानापूर कोर्टाने दिला अन् कोर्ट आवारात एकच जल्लोष…
आज दुपारी खानापूर कोर्टाने प्रा. नितीन भानगुडे पाटील आणि शिवसेना नेते रामदास कदम यांना निर्दोष म्हणून घोषित केल्यानंतर कोर्ट आवारात एकच जल्लोष पहायला मिळाला, तात्कालीन समिती नेते यशवंत बिर्जे यांनी या खटल्यामध्ये जामीन म्हणून चोख भूमिका पार पाडली.