खानापुरात मोबाईल ‘फर्टिलीटी’ क्लिनिकचे एमडी सदानंद पाटील यांच्या हस्ते उद्घघाटन; मान्यवरांची उपस्थिती..
आजकाल मुले -बाळे होण्यासाठी अनेक दांपत्य कित्येक वर्षांपासून मोठमोठ्या डॉक्टरांकडे उपचार घेताना दिसतात. पण, त्याला कितपत यश येईल हे ज्यांच्या -त्यांच्या उत्तम आरोग्य राखण्याबरोबर नशिबावर अवलंबून असते असे म्हटले तरी वावगे ठरू नये. त्याचाच विचार करत अशा दाम्पत्यांना दिलासा देण्यासाठी ओयासीस इन्फर्टिलीटी तज्ञांच्या संस्थेने मोबाईल ‘फर्टिलीटी’ क्लिनिकची योजना आणली असून, ती अनेक गरजू दाम्पत्यांसाठी जननी ठरणार असल्याचे मत तालुका डॉक्टर संघटनेचे अध्यक्ष डॉ. डी. ई. नाडगौडा यांनी व्यक्त केले. नुकतेच खानापुरात मोबाईल ‘फर्टिलीटी’ क्लिनिकचे लैला शुगर्सचे एमडी सदानंद पाटील यांच्या हस्ते उद्घघाटन करण्यात आले. यावेळी डॉक्टर संघटनेचे उपाध्यक्ष डॉ मदनकुमार कुंभार, डॉ. सुदर्शन सुळकर, राजेंद्र रायका, गुंडू तोपीनकट्टी, सदानंद मासेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलतांना, डॉ. नाडगौडा म्हणाले की, नवरा आणि बायकोने लाजण्याची गरज नाही, ती प्रत्येकाची नैसर्गिक बाब आहे. आधुनिक विज्ञान त्याहून पुढे गेले असून, त्याचा सर्वांनी स्वीकार केला पाहिजेत. तरच डॉक्टरांनी नवनवीन उपचार करण्यास सोपे जाते, शिवाय दांपत्यानाही दिलासा मिळू शकतो असेही त्यांनी सूचित केले. यावेळी डॉ. श्वेता सोनवलकर यांनी मोबाईल ‘फर्टिलीटी’ क्लिनिकबद्दल माहिती दिली, त्या म्हणाल्या की, आवश्यक तपासण्या, आययुआय, आरव्हीएफ आणि नवीन उपचार पद्धती उपस्थितांना पटवून सांगितल्या. या मोबाईल ‘फर्टिलीटी’ क्लिनिकमुळे खानापूर तालुक्यातील गरजू दाम्पत्यांना मोठा दिलासा मिळणार आहे असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.