तालुका पंचायत अधिकाऱ्यांना सूचना; काटगाळी गावकऱ्यांची लक्ष्मी यात्रेसंदर्भात पार पडली बैठक, 19 वर्षानंतर होणार यात्रा…
जांबोटी :लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
पुढील वर्षी काटगाळी (ता. खानापूर) गावाचे ग्रामदैवत लक्ष्मी देवीची जत्रा तब्बल १९ वर्षांच्या प्रदीर्घ होणार आहे, त्यासाठी विकासकामे राबविणे गरजेचे आहे. पाणी, रस्ते, लक्ष्मी यात्रेच्या ठिकाणी लागणाऱ्या सर्व सुविधा युद्धपातळीवर पुरविल्या पाहिजेत. केंद्र शासनाच्या व्हीजीरामजी योजनेतर्गत सर्वच कामे याठिकाणी राबविली पाहिजेत, यात्रेसाठी लागणारा जादा विद्युत पुरवठा, रस्ते, पाणी, गावची स्वच्छता या सर्व सुविधा स्थानिक ग्रामपंतीच्या माध्यमातून तालुका पंचायतीने करून घ्यावीत असा आदेश यावेळी उपस्थित असलेल्या तालुका पंचायत ईओ रमेश मैत्री यांना दिला. यावेळी गावकऱ्यांनी गावच्या बाबतीत उद्भवणाऱ्या समस्या आणि सुविधा अधिकारी आणि आमदारांच्या समोर मांडल्या. त्यावर आमदारांनी वरील आदेश दिला. अध्यक्षपदावरून आमदार बोलत होते.

यावेळी तालुका पंचायत ईओ रमेश मेस्त्री, अभियंते जाधव, कृषी खात्याचे तालुका अधिकारी डी. बी. चव्हाण स्थानिक अधिकारी उपस्थित होते.
यावेळी खालील समस्या गावकऱ्यांनी मांडल्या…
यामध्ये काटगाळी ते हायवे रस्ता, गणीबैल व निट्टूर जोड रस्ते, नागुर्डा व मोदेकोप रस्ता, गावातील चक्कर लाईन रस्ता, गणपती गल्ली पेव्हर्स ब्लॉक, रामलिंग व कल्मेश्वर मंदिरांची दुरुस्ती आणि रस्ते, ३५ नवीन विद्युत खांब, ६ हायमास्ट दिवे, नवीन बोरवेल व पाण्याच्या टाक्या उभारणे आदी समस्या मांडल्या. भाजप नेते चेतन मनेरीकर
भाजप नेते शंकर पाटील, नारायण गुरव ,माजी चेअरमन, तोपीनकट्टी ग्रामपंचायत, दत्ता कदम (भाजपा युवा नेते), आर. व्ही. जाधव (इंजिनिअरिंग उपविभाग), सीडीपीओ अधिकारी
पी.डी.ओ. (नागुर्डा ग्रामपंचायत), काटगाळी पंच कमिटी, गावातील नागरिक व शासकीय अधिकारी.