मच्छे स्टेशनमधील कमी केव्ही टीसी बदलून मोठी टीसी जोडण्यासाठी दीड दिवस लागणार; त्यामुळे याआधी अधून -मधून एक दोन तास खंडित होणारी विद्युत सेवा अखंडित राहणार असल्याची हेस्कॉमकडून माहिती…
खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
किणये -जांबोटी पश्चिम भागाला पुरवठा होणाऱ्या मच्छे स्टेशनमध्ये असलेल्या कमी केव्हीच्या टीसीमुळे अनेक समस्या उद्भवल्या लागल्या आहेत, त्यामुळे हा टीसी बदलून त्याठिकाणी अधिक केव्हीचा टीसी बसवण्यात येणार आहे, त्यासाठी उद्या शुक्रवार दिनांक 7 रोजी सकाळी 9 ते शनिवारी सायंकाळी 4 वाजेपर्यंत जांबोटी भागातील वीज पुरवठा खंडित अर्थात बंद राहणार आहे, असे तालुका हेस्कॉम अधिकारी प्रवीण बरगाळे यांनी लेखी कळविले आहे. जांबोटी , बैलुर, कापोली, गोल्याबळी, आमटे भागात वीज पुरवठा खंडित असेल…
